Palak Paneer Pocket Paratha Recipe: मुले अनेकदा वेगवेगळ्या आणि टेस्टी पदार्थांची मागणी करतात. विशेषतः संध्याकाळच्या भुकेसाठी त्यांना काहीतरी चटपटीत आणि वेगळे पदार्थ हवे असते. अशा परिस्थितीत तुम्ही घरीच एक टेस्टी आणि हेल्दी पदार्थ तयार करून त्यांना खायला देऊ शकता. पालक पनीर पॉकेट पराठा खायला जेवढा टेस्टी आहेत तेवढाच तो आरोग्यादायी सुद्धा आहे. पालक खाण्यासाठी मुले नेहमी कंटाळा करतात. अशावेळी तुम्ही या रेसिपीतून त्यांना पालकाचे पोषक घटक देऊ शकता. संध्याकाळी जेव्हा मुले काहीतरी मागतात तेव्हा झटपट पालक पनीर पॉकेट पराठा तयार करून त्यांना खायला द्या. जाणून घ्या याची रेसिपी.
- १ कप पालक
- १ कप पनीर
- गव्हाचे पीठ
- १ कांदा बारीक चिरलेले
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- काळी मिरी पावडर
- लाल तिखट
- जिरे पूड
- चाट मसाला
- चीज स्लाईस
- देशी तूप
- चवीनुसार मीठ
- पाणी
सर्वप्रथम पोळीसारखे मळतो तसे गव्हाचे पीठ मळून घ्या आणि बाजूला ठेवा. आता पालक नीट धुवून बारीक चिरून घ्या. एका भांड्यात चिरलेला पालक घ्या. यात पनीर मॅश करून मिक्स करा. या मिश्रणात मीठ, काळी मिरी, जिरेपूड, चाट मसाला, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाका आणि नीट मिक्स करा. आता मळलेल्या पीठाचा गोळा खघ्या आणि त्याची पोळी लाटून घ्या. मधोमध चीज स्लाईस ठेवा. त्यावर पालक आणि पनीरचे तयार मिश्रण ठेवा. चारही बाजूंनी फोल्ड करा. आणि हलके पाणी लावून त्याच्या कडा चिकटवा. जेणेकरून भाजताना ते उघडणार नाहीत. तवा चांगला गरम करून त्यावर हे तयार केलेले पॉकेट सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजण्यासाठी देशी तूप किंवा बटर वापरा. तुम्हाला जास्त क्रिस्पी आणि टेस्टी हवे असेल तर बटर वापरा. तुमचे पालक पनीर पॉकेट पराठा तयार आहे. मुलांना टोमॅटो सॉस किंवा चिली सॉस सोबत खायला द्या.