Tasty and Healthy Fruit Sandwich Recipe: लहान मुले असो वा मोठे सँडविच खायला प्रत्येकाला आवडते. विविध प्रकारचे सँडविच प्रत्येक जण आवडीने खातो. पण हेच सँडविच मुलांसाठी हेल्दी पद्धतीने बनवायचे असेल तर तुम्ही फ्रूट सँडविच बनवू शकता. खरं तर फुले फळं खाण्यासाठी कंटाळा करतात. त्यांना स्नॅक्समध्ये चटपटीत पदार्थ खायला आवडतात. तुम्ही नेहमीच्या फळांचा ट्विस्ट देऊन त्यापासून टेस्टी सँडविच बनवू शकता. विशेष म्हणजे यात तुम्ही तुमच्या आवडीचे सर्व फळे टाकू शकता. ही रेसिपी टेस्टी असण्यासोबतच आरोग्यासाठी देखील हेल्दी आहे. शिवाय मुले सर्व फळे आवडीने खातील. हे तुम्ही मुलांना संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा सकाळच्या नाश्त्यात किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. चला तर मग जाणून घ्या टेस्टी आणि हेल्दी फ्रूट सँडविच कसे बनवावे.
- २ ब्रेड स्लाइस
- २ मध्यम स्ट्रॉबेरी
- १/४ केळ
- ४ ब्लूबेरी
- १ टेबल स्पून मिक्स फ्रूट जॅम
- १ टेबल स्पून बटर
- चिमूटभर मीठ
फ्रूट सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम दोन ब्रेड स्लाइस घ्या. एका स्लाइसवर मिक्स फ्रूट जॅम लावा. दुसऱ्या स्लाइसवर बटर लावा. आता फळांचे शक्य तेवढे पातळ कापून घ्या. तुम्ही यात तुमच्या आवडीचे सर्व फळे वापरू शकता. हे फळांचे पातळ काप एका ब्रेड स्लाइसवर चांगले पसरवून घ्या. आता यावर चिमूटभर मीठ स्प्रेड करा. दुसऱ्या स्लाइसने त्याला कव्हर करा. तुमचा फ्रूट सँडविच तयार आहे. तुम्ही याला मधून कट देखील करू शकता.
संबंधित बातम्या