How to Prevent Artificial Jewellery From Tarnishing: आजकाल मुलींना आर्टिफिशियल ज्वेलरी घालायला आवडतात. यात अनेक प्रकारची विविधता आणि डिझाईन्स असतात, जे तुम्ही कपडे आणि प्रसंगानुसार घालू शकता. हेवी ते लाइट वेटेड नेकपीस, इयररिंग्स सर्व काही उपलब्ध आहेत. पण आर्टिफिशियल असूनही त्यांचे दर अनेकदा खूप जास्त असतात. अशा वेळी ते एकदाच घालणे किंवा वापरणे पुरेसे नाही. पण हे दागिने जास्त काळ ठेवायचे असतील तर ते अनेकदा काळे पडतात. मटेरियलवरील पेंट उतरू लागतो. विशेषतः पाणी, साबण असे काही जर लागले तर एका वापरातच खराब होतात. पण आता स्मार्ट ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही हे दागिने सहज स्टोअर करू शकता. जेणेकरून तुम्ही हे दागिने पुन्हा पुन्हा घालू शकाल.
मोती किंवा गोल्ड, सिल्व्हर अशा रंगांनी रंगवलेले दागिने घामामुळे कधी कधी काळे पडतात. चुकून साबण आणि पाणी लागल्यास ते खराब होणे निश्चित आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्या दागिन्यांचा रंग जपून ठेवा.
नखे चमकदार दिसण्यासाठी नेल पेंटच्या शेवटच्या कोटला ट्रान्सपरंट नेलपेंट अनेकदा लावली जाते. या नेल पेंटचे काम केवळ नखे चमकदार दिसणे एवढेच नाही तर यामुळे तुमचे दागिनेही चमकतील. दागिने खरेदी केल्यानंतर त्यावर ट्रान्सपरंट नेलपेंटचा कोट लावावा. चांगल्या क्वालिटीचे ट्रान्सपरंट नेलपेंट एका कोटमध्येच नीट लागून जाईल. कुंदनापासून मोती आणि धातूला चारही बाजूंनी लावा. चांगले कोरडे होऊ द्या. यामुळे तुमच्या दागिन्यांची चमक कायम राहण्यास मदत होईल.
जर तुम्ही एखाद्या होलसेल शॉपमध्ये ज्वेलरी खरेदी करण्यासाठी गेलात तर ते दागिने नेहमी ट्रान्सपरंट पॉलिथीनमध्ये ठेवतात. त्यामुळे दागिने नेहमी नीट कव्हर करून ठेवा. ट्रान्सपरंट पॉलिथीनमध्ये गुंडाळल्यानंतर दागिन्यांच्या डब्यात ठेवा. यामुळे दागिन्यांची चमक अबाधित राहील. जर तुम्ही या दोन ट्रिक्सचा अवलंब केला तर तुमचे महागडी आर्टिफिशियल ज्वेलरी वर्षानुवर्षे चमकतील आणि तुम्ही ते पुन्हा पुन्हा घालू शकाल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)