Things Never Do While Teaching Discipline to Child: मुलांचे संगोपन करणे सोपे काम नाही. मुले अनेकदा आरशासारखी असतात. तुम्ही त्यांच्या कामात आणि वागण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहू शकाल. तुमची सर्व चांगली कामे करण्यासोबत तुमच्या मुलाने शिस्तबद्ध राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर सर्वप्रथम पालकांनी स्वतःमध्ये शिस्तीची सवय लावली पाहिजे. मुले शिकतात कमी पण कॉपी सहज करतात. आई-वडील जे काही काम करतात ते मुलं अगदी सहज करतात. त्यामुळे पालकांनी मुलांना शिस्त शिकवण्यापूर्वी या तीन गोष्टी नेहमी कराव्यात.
जेव्हा तुमच्या मुलांकडून चूक झाली तेव्हा तुम्ही त्यांना सहजपणे माफी मागायला सांगा किंवा त्यांची चूक मान्य करा. पण स्वतःच्या चुकीवर पालक गप्प बसतात. ही चांगली सवय नाही. पालकांकडून जेव्हा एखादी चूक होते किंवा काहीतरी गडबड होते तेव्हा लगेचच ती चूक मुलासमोर मान्य करा. असे केल्याने मुलांमध्ये सुद्धा त्यांच्या चुकांची जबाबदारी घेण्याची भावना निर्माण होईल.
जर तुम्ही काही काम करण्याचे वचन मुलांना देता पण ते करण्याच्या वेळी काहीतरी कारण देऊन ते टाळता. किंवा जर मुलाने चूक केली तर ते त्याला काहीतरी खोटे बोलून घाबरवतात. तर ही सवय त्वरित बंद करा. यामुळे मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय सहजतेने तयार होईल. तुमच्या शब्दांवर ठाम राहा. जर तुम्ही तुमच्या मुलाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करा. तसेच प्रत्येक समस्येवर घाबरू नका.
तुम्ही अनेकदा ऐकले असेल की तुमच्या मुलांची इतरांच्या मुलांशी, वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी तुलना करू नका. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होतो. पण मुलांच्या कुशाग्र मनामध्ये इतर पालकांची चांगली असल्याची प्रतिमा तयार होऊ लागते आणि ते तुमची तुलना इतर पालकांशी करू लागतात. त्यामुळे मुलांची इतर मुलांशी कधीही तुलना करू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)