Skin Care Tips: चेहऱ्यावर अवेळीच सुरकुत्या पडू लागल्यात? कोलेजन असू शकते मोठे कारण! अशी घ्या काळजी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care Tips: चेहऱ्यावर अवेळीच सुरकुत्या पडू लागल्यात? कोलेजन असू शकते मोठे कारण! अशी घ्या काळजी

Skin Care Tips: चेहऱ्यावर अवेळीच सुरकुत्या पडू लागल्यात? कोलेजन असू शकते मोठे कारण! अशी घ्या काळजी

Published Oct 08, 2024 02:20 PM IST

Skin Care Tips for wrinkles: धावपळीच्या काळात त्वचेची योग्य ती काळजी घेणे कधीकधी शक्य होत नाही. याचाच परिणाम हळूहळू चेहऱ्यावर दिसू लागतो.

Skin Care Tips
Skin Care Tips

Skin Care Tips In Marathi: प्रत्येक व्यक्तीचा चेहरा ही त्याची प्राथमिक ओळख असते. व्यक्तीच्या सौंदर्याचा आरसा म्हणजे आपला चेहरा. मग अशा सौंदर्यावर डाग आणि सुरकुत्या असतील तर, कुणालाही चिंता वाटूच शकते. सध्याची बदलती जीवनशैली, धावपळीचं आयुष्य आणि आहाराच्या बदललेल्या सवयी यामुळे अनेक वेगवेगळे दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसू लागतात. मात्र, त्वचेवर याचा सगळ्यात जास्त आणि ठळक परिणाम दिसतो. धावपळीच्या काळात त्वचेची योग्य ती काळजी घेणे कधीकधी शक्य होत नाही. याचाच परिणाम हळूहळू चेहऱ्यावर दिसू लागतो. अगदी तारुण्यातच चेहऱ्यावर सुरकुत्या, पुळ्या आणि डाग दिसू लागतात. ही लक्षण तुमच्या त्वचेतील कोलेजनची पातळी घसरल्याची लक्षणं देखील असू शकतात. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल, तर वेळीच त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. मात्र, आपल्या त्वचेतील कोलेजनची पातळी संतुलित राहावी यासाठी तुम्ही आधीच थोडी काळजी देखील घेऊ शकता.

काय आहे त्वचेतील कोलेजन आणि कसे राखावे संतुलन?

त्वचेतील कोलेजन हा एक प्रथिनांचा प्रकार आहे. आपल्या शरीरातील एकूण प्रथिनांपैकी ३०% भाग हा कोलेजनचा असतो. कोलेजनमुळे त्वचा निरोगी आणि घट्ट राहते. त्वचेचा पोत जपण्याचं आणि त्वचेला हायड्रेट ठेवण्याचं काम कोलेजन करतं. त्वचेतील कोलेजन कमी झाले तर, त्वचा काळवंडणे, सुरकुत्या येणे, ड्राय स्कीन अशा समस्या डोकं वर काढू लागतात. त्वचेतील कोलेजन कमी होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. थेट चेहऱ्यावर पडणारा सूर्यप्रकाश, धुम्रपान आणि आहारातील साखरेचं प्रमाण या गोष्टी त्वचेतील कोलेजनसाठी घातक ठरू शकतात. साखरेच्या अति सेवनामुळे कोलेजनची पातळी घसरू लागते. अशावेळी त्वचेतील कोलेजनची पातळी संतुलित राहावी यासाठी आधीच काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कशी राखाल त्वचेतील कोलेजनची पातळी संतुलित?

आहारात व्हिटामिन सीचा समावेश करा

मानवी शरीरात कोलेजनची निर्मिती करण्यात व्हिटामिन सी हा अतिशय महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे आहारात व्हिटामिन सी युक्त पदार्थांचा समावेश करणं अतिशय गरजेच आहे. सायट्रिक अॅसिडयुक्त पदार्थांमध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते. यासाठी तुम्ही आपल्या आहारात लिंबू, संत्री आणि इतर लिंबूवर्गीय फळांचा समावेश करू शकता. यासोबतच ब्रोकोली, स्ट्रॉबेरी आणि काळे मनुके यांचा आहारात समावेश करू शकता.

Face Mask: दसऱ्याला चेहऱ्यावर हवा इंस्टंट ग्लो? लावा हे फेस मास्क, पाहा वापरण्याची योग्य पद्धत

सनस्क्रीन लावूनच बाहेर पडा

आपली त्वचा ही अतिशय नाजूक असते. त्वचेवर थेट पडणारी सूर्यकिरणं देखील आपल्या त्वचेच नुकसान करू शकतात. अशा हानिकारक सूर्यकिरणांना आपल्या त्वचेवर परिणाम करण्यापासून दूर ठेवण्याचे काम सनस्क्रीन करते. बाजारात अनेक प्रकारचे सनस्क्रीन उपलब्ध आहेत. तुम्ही आपल्या त्वचेचा पोत जाणून घेऊन योग्य ते सनस्क्रीन निवडू शकता.

कोरफडीचा गर करेल मदत

काटेरी कोरफड ही अतिशय औषधी आहे. आपल्या त्वचेला थंडावा देण्यापासून ते त्वचेवरील रोमछिद्रे बंद करण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये कोरफड फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही आपल्या त्वचेवर कोरफडीचा गर चोळू शकता किंवा बाजारात मिळणारे तयार जेल वापरू शकता. 

स्कीन केअर रुटीन फॉलो करा

त्वचेची काळजी घेण्यासाठी एखादे स्कीन केअर रुटीन फॉलो करा. यामध्ये त्वचेच्या हायड्रेशनची काळजी घ्या. स्कीन सीरम, टोनर, मसाज क्रीम अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करा. परंतु, याआधी आपल्या त्वचेचा पोत जाणून घ्या आणि योग्य ते प्रॉडक्ट निवडा. याशिवाय चेहऱ्याला नियमित मसाज करा. 

‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळा!

> सनस्क्रीन न लावता थेट सूर्यप्रकाशात बाहेर पडणे.

> धुम्रपान करणे.

> साखरयुक्त पदार्थांचे सेवन करणे.

(Disclaimer: वरील लेखात दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित असून, कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. )

Whats_app_banner