Tamarind Face Pack: सुरकुत्या आणि डार्क सर्कलचा शत्रू आहे चिंचेचा फेस पॅक, पाहा लावण्याची योग्य पद्धत-skin care tips try this tamarind face pack to get rid of dark circle and wrinkles ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tamarind Face Pack: सुरकुत्या आणि डार्क सर्कलचा शत्रू आहे चिंचेचा फेस पॅक, पाहा लावण्याची योग्य पद्धत

Tamarind Face Pack: सुरकुत्या आणि डार्क सर्कलचा शत्रू आहे चिंचेचा फेस पॅक, पाहा लावण्याची योग्य पद्धत

Sep 16, 2024 02:50 PM IST

Skin Care Tips in Marathi: चेहऱ्याला नैसर्गिक चमक देताना सुरकुत्या आणि डार्क सर्कलची समस्या दूर होण्यास चिंचेचे फेस पॅक मदत करते. हा चिंचेचा फेस पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

skin care tips: चिंचेचा फेस पॅक
skin care tips: चिंचेचा फेस पॅक

Tamarind Face Pack for Dark Circle and Wrinkles: किचन साफ करण्यापासून चटणी बनवण्यापर्यंत तुम्ही आजवर अनेकदा चिंचेचा वापर केला असेल. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा चिंचेचा वापर करू शकता. होय, चिंच मध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे गुणधर्म असतात. ज्यामुळे चेहऱ्याला नैसर्गिक चमक येण्यासोबतच सुरकुत्या आणि डार्क सर्कलची समस्या दूर होण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊया चिंचेचा फेस पॅक कसा बनवायचा.

टॅनिंग आणि डार्क सर्कलसाठी चिंच आणि मुलतानी मातीचा फेस पॅक

जर तुमची त्वचा सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे टॅन झाली असेल तर तुम्ही आपल्या त्वचेवर चिंच आणि मुलतानी मातीपासून बनवलेला फेस पॅक लावू शकता. हा फेस पॅक बनवण्यासाठी सर्व प्रथम चिंचेच्या गरमध्ये १ चमचा मुलतानी माती, १ चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून सर्व गोष्टींची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून साधारण १० मिनिटे वाळण्यासाठी राहू द्या. ठराविक वेळेनंतर फेस पॅक सुकल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करून धुवा. हा चिंचेचा फेस पॅक टॅनिंग आणि डार्क सर्कलच्या समस्येवर मात करण्यास मदत करतो.

वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यासाठी चिंचेचा आणि रव्याचा फेस पॅक

चिंच आणि रव्याचा हा फेस पॅक वृद्धत्वाचा प्रभाव कमी करतो आणि त्वचा मुलायम बनवते. हा फेस पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम चिंच गरम पाण्यात टाकावी लागेल जेणेकरून चिंच मऊ होऊन गर वेगळा होईल. त्यानंतर चिंचेच्या गर मध्ये १ चमचा रवा, १ चमचा मध, १ चमचा बेसन आणि गुलाब जल मिसळून पेस्ट तयार करावी. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून साधारण २० मिनिटे राहू द्या. ठरलेल्या वेळेनंतर चेहरा धुवून घ्या आणि मॉइश्चरायझर लावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग