Dasara Skin Care: दसऱ्यापूर्वी क्लीअर होईल उन्हाने काळवंडलेला चेहरा, टॅनिंग दूर करेल हा घरगुती फेस पॅक
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dasara Skin Care: दसऱ्यापूर्वी क्लीअर होईल उन्हाने काळवंडलेला चेहरा, टॅनिंग दूर करेल हा घरगुती फेस पॅक

Dasara Skin Care: दसऱ्यापूर्वी क्लीअर होईल उन्हाने काळवंडलेला चेहरा, टॅनिंग दूर करेल हा घरगुती फेस पॅक

Oct 04, 2024 01:52 PM IST

Homemade Face Pack: जर टॅनिंगमुळे तुमचा चेहरा काळा दिसू लागला असेल तर तो साफ करण्यासाठी तुम्ही या फेस पॅकचा वापर करू शकता. टॅन रिमूव्हल फेस पॅक घरी कसा बनवायचा ते येथे पाहा.

टॅन रिमूव्हल फेस पॅक
टॅन रिमूव्हल फेस पॅक (freepik)

Tan Removal Face Pack: टॅनिंग झाल्यामुळे त्वचा काळी दिसू लागते. सनस्क्रीन किंवा फेस कव्हर न करता उन्हात बाहेर पडल्यास तुम्हाला या समस्येचा सामना करावा लागू शकतो. जर टॅनिंगमुळे चेहरा काळा झाला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही काही घरगुती फेस पॅक वापरू शकता. नवरात्र सुरु झाले असून दसरा जवळ येत आहे, त्यामुळे या सणापूर्वी चेहरा उजळवणे चांगले. चला तर मग जाणून घेऊया टॅन रिमूव्हल फेस पॅक घरी कसे बनवता येतील.

केशर आणि फ्रेश क्रीमने बनवा फेस पॅक

टॅनिंगमुळे त्वचा काळी आणि निर्जीव दिसू शकते. अशावेळी केशर आणि फ्रेश क्रीम म्हणजेच दुधाची साय तुमच्यासाठी काम करेल. यासाठी तुम्हाला थोडे केशरचे धागे आणि एक चमचा फ्रेश क्रीमची गरज आहे. आता हा पॅक बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये दोन्ही गोष्टी मिक्स करून गुळगुळीत पेस्ट बनवा. आता हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि नंतर सर्कुलर मोशनमध्ये मसाज करा. त्यानंतर १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

संत्र्याचा रस आणि दहीने बनवा फेस पॅक

संत्री तुमच्या त्वचेवरील सन टॅन काढून टाकू शकते. त्याचबरोबर दही त्वचेला मॉइश्चरायझ आणि ग्लोइंग करण्यास मदत करते. हे बनवण्यासाठी एक चमचा संत्र्याचा रस आणि एक चमचा दही घ्या. नंतर दोन्ही गोष्टी नीट मिक्स करून गुळगुळीत पेस्ट बनवा. हा पॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर ३० ते ४० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर पाण्याने धुवा.

काकडी, लिंबाचा रस आणि गुलाब जल

या फेस पॅकमध्ये वापरण्यात येणारे सर्व घटक त्वचेसाठी चांगले आहेत. हा पॅक बनवण्यासाठी एक चमचा किसलेली काकडी, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा गुलाब जल घ्या. नंतर एका बाऊलमध्ये सर्व काही मिक्स करून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर व मानेवर लावून ३० मिनिटे राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner