Home remedies for oily skin: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केवळ पाऊसच दिसत नाही. तर त्यासोबतच वातावरणात आर्द्रताही खूप जास्त असते. पावसाळ्याच्या दिवसात जर आपल्या त्वचेची सर्वात मोठी समस्या असेल, तर ती म्हणजे आपल्या तेलकट त्वचेची समस्या होय. हवेतील आर्द्रता हे जास्त घाम येणे आणि सीबम निर्मितीचे एक प्रमुख कारण आहे. या दोन्ही गोष्टींमुळे आपल्या त्वचेतील छिद्र बंद होतात आणि त्यामुळे आपल्याला मुरुम आणि निस्तेज त्वचेच्या समस्येला सामोरे जावे लागते. आज या लेखात आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही या पावसाळ्याच्या दिवसात त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकाल. पाहूया ते उपाय नेमके काय आहेत.
जर तुम्हाला तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकायच्या असतील तर तुम्ही नियमितपणे तुमची त्वचा एक्सफोलिएट करावी. नियमित एक्सफोलिएशन केल्याने बंद झालेली छिद्रे उघडण्यास मदत होते. तुमची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी, चंदनाचे अर्क आणि अक्रोडाची साल असलेले उत्पादन निवडा. यामुळे तुमची स्किन टोन सुधारण्यासोबतच पिंपल्सची समस्याही कमी होण्यास मदत होते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉफी किंवा डी-टॅन स्क्रबदेखील वापरू शकता. हे तुमच्या त्वचेला तेज प्रदान करते.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी चेहरा नियमियतपणे स्वच्छ करणे गरजेचे आहे. विशेषत: जेव्हा हवामान दमट असते तेव्हा चेहऱ्याची नियमित साफसफाई फार महत्त्वाची ठरते. आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी, कडुनिंब किंवा व्हिटॅमिन सी असलेले उत्पादन निवडा. कडुनिंब तुमच्या चेहऱ्यावर निर्माण होणारे अतिरिक्त तेल आणि मुरुमांवर नियंत्रण ठेवते, तर व्हिटॅमिन सी तुमची त्वचा उजळ करते आणि काळे डाग कमी करते. जर तुम्ही तुमची त्वचा स्वच्छ करण्यासाठी या गोष्टी वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेतील अतिरिक्त तेलच काढून टाकत नाही, तर तुमच्या चेहऱ्याला फ्रेश लुक देखील देते.
या पावसाळ्याच्या दिवसांतही तुम्ही सनस्क्रीन न विसरता वापरणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही स्वतःसाठी लाइट जेल आधारित सनस्क्रीन निवडू शकता. तुम्ही वापरत असलेल्या सनस्क्रीनमध्ये ६० पेक्षा जास्त SPF असावा हे लक्षात ठेवा. तुम्ही वापरत असलेल्या सनस्क्रीनमध्ये कोरफड आणि व्हिटॅमिन सी सारखे घटक आहेत याची खात्री करून घ्या. सनस्क्रीनमुळे चेहऱ्याची पोत उत्तम राहण्यास मदत होते.
जर तुम्हाला तुमची त्वचा हायड्रेट ठेवायची असेल आणि तेही तेलकट न होता, तर तुम्ही हलके मॉइश्चरायझर किंवा जेल निवडू शकता. अशात तुम्ही तुमच्यासाठी टेंडर कोकोनट जॅक निवडू शकता. तुमच्या त्वचेसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासोबतच ते तुमच्या चेहऱ्यावरील छिद्रही टाईट करतात. यामध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्मदेखील असतात जे तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मॉइश्चरायझरचा आवर्जून वापर करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)