Right Way to Wash Face: बदलत्या ऋतूनुसार स्किन केअरची पद्धतही बदलली पाहिजे. तथापि, स्किन केअर फेस वॉशने सुरू होते. अशा वेळी चेहरा धुण्यासाठी योग्य पद्धतीचा अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने चेहरा धुतल्याने फायद्याऐवजी नुकसान होते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की फेस वॉशची योग्य पद्धत कोणती? यासोबतच दिवसातून किती वेळा चेहरा धुणं योग्य आहे, अशा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला आहे का? अशा परिस्थितीत येथे जाणून घेऊया चेहरा धुण्याची योग्य पद्धत आणि दिवसातून किती वेळा चेहरा धुवावा
आपल्या त्वचेवरील घाण आणि बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी दिवसातून दोनदा आपला चेहरा धुवा. एकदा सकाळी उठल्यानंतर आणि एकदा रात्री झोपण्याआधी. याशिवाय तुमच्या जीवनशैलीचा विचार करून चेहरा क्लीन केला पाहिजे. जर तुम्ही बाहेरून कुठून तरी आला असाल जिथे धूळ, माती असेल तर दिवसातून एकदा चेहरा धुवावा. बॅक्टेरिया आणि घाण टाळण्यासाठी आपल्या चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी नेहमीच आपले हात स्वच्छ करा.
यासाठी आपला चेहरा कोमट पाण्याने ओला करावा आणि टी झोन आणि जॉ लाइनवर लक्ष देऊन सर्कुलर मोशनमध्ये क्लीन करावे. चेहरा स्वच्छ करण्यासाठी जास्त हार्ड स्क्रबिंग टाळा. आपण त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी फक्त २० ते ३० सेकंद घेतले पाहिजे. आपला चेहरा चांगल्या प्रकारे धुवा आणि मऊ टॉवेलने टॅप करत हळुवारपणे कोरडे करा. हे लक्षात ठेवा की जास्त काळ फोम बनविणे म्हणजे चांगली साफसफाई नाही.
जे लोक मेकअप लावतात त्यांनी मेकअप काढून टाकण्यासाठी आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा सौम्य फेस वॉशने त्वचा स्वच्छ केली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा धुणे गरजेचे आहे. तसे न केल्यास बारीक रेषा आणि सुरकुत्या वेळेपूर्वीच दिसू लागतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या