Do's and Don'ts of Applying hydrating Face Mask: त्वचेला अधिक प्रमाणात हायड्रेट करण्यासाठी हायड्रेटिंग फेस मास्क लावला जातो. बाजारात विविध प्रकारचे हायड्रेटिंग फेस मास्क उपलब्ध आहेत. ते लावल्याने स्किन प्लम्पी आणि ग्लोइंग दिसू लागते. पण अनेक मुलींची तक्रार आहे की मास्क लावल्यानंतरही चेहरा चमकत नाही. अशा परिस्थितीत ते हायड्रेटिंग फेस मास्कला दोष देतात. परंतु हायड्रेटिंग फेस मास्क लावण्यापूर्वी त्वचा कशी तयार करावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हायड्रेटिंग फेस मास्क लावण्यापूर्वी आणि नंतर त्वचेची नीट काळजी घेणे, त्वचा तयार करणे खूप आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त चांगले रिझल्ट मिळतील.
पहिली स्टेप म्हणजे त्वचा क्लींज करणे. चेहऱ्यावरील मेकअप आणि घाण काढून टाकणे महत्वाचे आहे. तुमच्या त्वचेला सूट होणाऱ्या क्लिन्जरच्या मदतीने त्वचा स्वच्छ करा. जेणेकरून हायड्रेटिंग मास्क त्वचेत सहज शोषला जाऊ शकतो.
हायड्रेटिंग मास्क लावण्यापूर्वी किंवा नंतर सीरम लावावा की नाही याबद्दल बरेच लोक कंफ्यूज असतात. हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की कोणताही हायड्रेटिंग मास्क लावण्यापूर्वी त्वचेवर सीरम लावा.
क्लींजिंग आणि सीरम किंवा टोनर लावल्यानंतर चेहऱ्यावर हायड्रेटिंग मास्क लावा. हे लावताना डोळे आणि नाकाला हात लागणार नाही याची काळजी घ्या. तसेच ते त्वचेला पूर्णपणे चिकटलेले राहिले पाहिजे. हा मास्क चेहऱ्यावर कमीत कमी अर्धा तास ठेवा.
हायड्रेटिंग मास्क कितीही मॉइश्चरायझिंग असला तरीही मास्क काढून टाकल्यानंतर मॉइश्चरायझिंग क्रीम लावा. याने त्वचेला खूप फायदा होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या