Oats for Skin: ड्राय आणि कोमेजलेल्या त्वचेपासून मुक्ती देईल ओट्स, वापल्याने चेहरा होईल सॉफ्ट
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Oats for Skin: ड्राय आणि कोमेजलेल्या त्वचेपासून मुक्ती देईल ओट्स, वापल्याने चेहरा होईल सॉफ्ट

Oats for Skin: ड्राय आणि कोमेजलेल्या त्वचेपासून मुक्ती देईल ओट्स, वापल्याने चेहरा होईल सॉफ्ट

Published Sep 14, 2024 02:49 PM IST

Skin Care With Oats: ड्राय स्किन असलेल्या लोकांना बऱ्याचदा अशी समस्या असते की त्यांची त्वचा कोमजलेली आणि फ्लॅकी दिसते. जर तुम्हाला ही समस्या असेल तर तुम्ही ओट्स वापरू शकता. पाहा कसे वापरावे

skin care tips: त्वचेवर ओट्स कसे वापरावे
skin care tips: त्वचेवर ओट्स कसे वापरावे (Shutterstock)

How to Use Oats for Skin: जस जसे हवामान बदलत जाते तशी त्वचाही बदलत असते. आता लोकांना त्वचा कोरडी पडण्याची समस्या जाणवू लागली आहे. ज्या लोकांची त्वचा आधीच ड्राय असते, त्यांना या ऋतूत अधिक त्रास होऊ लागतो. तसेच या समस्येमुळे त्वचेची चमक कमी होते. अशा त्वचेला सामोरे जाण्यासाठी ओट्सचा वापर केला जाऊ शकतो. तुम्हाला सुद्धा कोरड्या त्वचेची समस्या असेल तर तुम्ही ओट्स वापरू शकता. हे कसे वापरावे हे येथे जाणून घ्या.

नारळ आणि ओट्स फेस पॅक

हा फेस पॅक तयार करण्यासाठी एक चमचा खोबरेल तेलात १ चमचा ओट्स, थोडे दूध आणि अर्धा चमचा मध मिक्स करा. सर्व काही व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फेस पॅक तयार करा आणि नंतर आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.

ओट्स मिक्स वापरा

कोरड्या त्वचेशी सामना करण्यासाठी १ चमचा ओट्सचे दूध घ्या आणि नंतर त्यात २ चमचे बेसन, चिमूटभर हळद घाला. चांगले मिक्स करा. नंतर ते चेहऱ्यावर लावा. हा पॅक कमीत कमी १५ मिनिटे राहू द्या, नंतर चांगले धुवून घ्या.

एलोवेरा आणि ओट्सने बनवा फेस पॅक

कोरफड कोरड्या त्वचेसाठी अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते. पोषक तत्वांनी समृद्ध कोरफड त्वचेवर पुरळ कमी करते. हा फेस पॅक बनवण्यासाठी फ्रेश एलोवेरा जेल आणि ओट्स नीट मिक्स करा. नंतर ते चेहऱ्यावर लावा. या फेस पॅकचा वापर केल्यास डेड स्किनची समस्या कमी होईल आणि चेहरा चमकू लागेल.

ओट्स दूध आणि केसरचा फेस पॅक

ओट्सचा दूध, चंदन पावडर आणि केशरचे काही तुकडे घ्या. मग या तीन गोष्टी नीट मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि नंतर कोरडी होऊ द्या. हे पूर्ण कोरडे झाल्यावर थंड पाण्याने धुवून टाकावे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner