Cooked Rice Face Pack: त्वचेची नीट काळजी घेतली नाही आणि अनहेल्दी डायटमुळे आपल्या त्वचेची चमक हरवते. एवढेच नाही तर तुम्ही कमी वयात म्हातारे दिसायला लागतो. आजकाल स्त्रिया चेहऱ्याची चमक पुन्हा आणण्यासाठी तांदूळचा वापर करतात. घरच्या घरी ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी भात सर्वोत्तम आहे. तुम्ही शिजवलेला भात आणि कच्चे तांदूळ या दोन्हीच्या मदतीने फेस पॅक तयार करू शकता. हा पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या.
हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे - शिजवलेले भात, दूध आणि मध. आता या तिनही गोष्टी घेऊन एका बाजूला ठेवा. पॅक तयार करण्यासाठी आधी शिजवलेले तांदूळ बारीक करा. नंतर त्यात थोडे दूध घाला. तुम्ही दुधासोबत तांदूळ बारीक करू शकता. आता त्यात मध मिक्स करा.
तुम्ही दुसर्या मार्गाने सुद्धा फेस पॅक तयार करू शकता. यासाठी साधारण अर्धा वाटी शिजवलेला भात बारीक करा आणि त्याची पेस्ट बनवा. या मिश्रणात १ चमचा लिंबाचा रस घाला. हा पॅक ऑइली स्किनसाठी चांगला आहे. तसेच या पॅकमध्ये १ चमचा मध टाका.
कच्च्या तांदळापासून फेस पॅक बनवण्यासाठी तांदळाची पावडर घ्या. नंतर त्यात दही आणि मध मिक्स करा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. तुम्ही घरी सुद्धा तांदळाचे पीठ तयार करू शकता. यासाठी थोडे तांदूळ चांगले धुवून कोरडे करून घ्यावेत. वाळल्यानंतर तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करा. त्याची बारीक पावडर तयार करा. तांदूळ बारीक करण्यापूर्वी पूर्णपणे कोरडा असावा हे लक्षात ठेवा.
हा फेसपॅक सुमारे २० मिनिटे चेहऱ्यावर लावा. पॅक सुकल्यानंतर सामान्य पाण्याने स्वच्छ करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)