How to Use Almond for Skin Care: बदाम ही गुणधर्मांची खाण आहे. हे खाल्ल्याने अनेक प्रकारचे सूक्ष्म पोषक घटक मिळतात. चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर किती परिणाम होईल याची कल्पना करा. तसे तर बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मसाज करण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुमच्याकडे बदाम तेल नसेल तर फेस पॅकमध्ये सुद्धा बदाम मिसळता येतात. फक्त एका बदामामुळे फेस पॅक सहज तयार होईल, ज्यामुळे चेहऱ्यावर चमक येते तसेच त्वचेवर दिसणाऱ्या बारीक रेषा आणि सुरकुत्या दूर होतात. खरं तर, बदाम त्वचेच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेस प्रतिबंधित करतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. ऑइली आणि ड्राय त्वचेवर बदाम कसे लावायचे ते जाणून घ्या.
तुमची स्किन ऑइली असली तरी बदामाच्या तेलापासून बनवलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावा. फेस पॅक बनवण्यासाठी एक ते दोन बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी हे बदाम बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. दह्यात बदामाची पेस्ट मिसळून फेस पॅक तयार करा आणि चेहऱ्यावर लावा.
ऑइली स्किनवर पिंपल्स आणि मुरुम लवकर येतात आणि त्यामुळे चेहरा निस्तेज दिसतो. दह्यात बदाम मिसळून लावल्याने पिंपल्स दूर तर होतातच, शिवाय चिकट दिसणारा चेहरा ही सुंदर आणि फ्रेश दिसतो.
ड्राय स्किन लवकर सुरकुत्या आणि बारीक रेषांना बळी पडते. अशावेळी बदामाचा फेस पॅक तुमची त्वचा चमकदार आणि तरुण होण्यास मदत करतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी ओट्स आणि दुध यामध्ये भिजवलेले बदाम मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. थोड्या वेळाने चेहरा स्वच्छ करा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)