Curd Facial to Remove Tan: उन्हाळ्याला सुरु झाली की पहिली समस्या जाणवते ते उन्हामुळे होणाऱ्या टॅनिंगची. अनेकांना फ्रिकल्सही येऊ लागतात. तसं तर चेहऱ्यावर फ्रिकल्स किंवा काळे डाग येण्याचे कारण जीवनसत्त्वाची कमतरता देखील असू शकते. जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचा तुमचा आधीचा चमकणारा रंग परत मिळवायचा असेल, चेहऱ्यावरील काळे डाग, टॅनिंग दूर करायचे असेल तर या गोष्टी दह्यात मिसळा आणि त्याने चेहऱ्यावर फेशियल करा. काही वापरानंतरच तुम्हाला तुमच्या त्वचेत फरक दिसेल. जाणून घ्या टॅनिंग दूर करण्यासाठी काय करावे.
- दही ३ चमचे
- १ चमचा फ्लेक्स सीड पावडर
- १/४ चमचा तुरटी
- १/२ चमचा ज्येष्ठमध पावडर
- १/२ चमचा कस्तूरी हळद पावडर
दहीमध्ये या चारही गोष्टींची पावडर ठराविक प्रमाणात मिक्स करा. ही पेस्ट चांगली स्मूद बनवा. जेणेकरून ते चेहऱ्यावर घासणार नाही. आता चेहरा नीट धुवा. त्यानंतर हा फेस पॅक लावा आणि अर्धा तास तसाच राहू द्या. अर्ध्या तासानंतर पाच ते सात मिनिटे सर्कुलर मोशनमध्ये हलक्या हाताने मसाज करा. दररोज हा फेस पॅक सतत लावल्याने काही महिन्यांत तुम्हाला त्वचेत फरक दिसेल.
तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे बुरशी नष्ट होते. तसेच ज्येष्ठमध पावडर आणि फ्लेक्स सीड पावडर त्वचेच्या छिद्रांना घट्ट करण्याचे काम करतात. यामुळे फक्त फ्रिकल्स आणि टॅनिंग नाहीसे होत नाही तर त्वचेचा सैलपणाही दूर होतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या