मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Fair Complexion: मसूर डाळपासून मुलतानी मातीपर्यंत, चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी वापरा या गोष्टी

Fair Complexion: मसूर डाळपासून मुलतानी मातीपर्यंत, चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी वापरा या गोष्टी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 22, 2024 01:48 PM IST

Skin Care Tips: उन्हाळ्याची चाहूल लागताच आपली त्वचा स्वच्छ करण्याची वेळ येते. चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी घरात असलेल्या या तीन गोष्टींचा वापर करता येतो. कसे ते जाणून घ्या.

रंग सुधारण्यासाठी फेस पॅक
रंग सुधारण्यासाठी फेस पॅक (unsplash)

Skin Care Remedies for Fair Complexion: गरमी वाढू लागली तसं उन्हाळा सुरू होणार असल्याची चाहूल लागली आहे. अशा परिस्थितीत आपले स्किन केअर बदलण्याची आणि उन्हात बसून खराब झालेले रंग सुधारण्याची वेळ जवळ आली आहे. प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेणे आवश्यक असते. हिवाळ्यात उन्हाव्यतिरिक्त धूळ, घाण आणि प्रदूषणामुळे त्वचेचा रंग डल होतो आणि त्वचा सुद्धा अनइव्हन होते. अशा परिस्थितीत चेहऱ्यावर काही गोष्टी लावून तुम्ही त्वचेचा रंग सुधारू शकता. चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी मुलतानी माती, मसूर डाळ आणि तांदूळ कसे वापरावे ते येथे जाणून घ्या. या गोष्टी वापरून तुम्ही चेहऱ्याचा रंग सुधारू शकता.

मुलतानी माती

मुलतानी माती रंग सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. ते वापरण्यासाठी मुलतानी माती पाण्यात भिजवा. नंतर बटाट्याचा एक तुकडा, टोमॅटो, एक चतुर्थांश लिंबू आणि एक चमचा दही ब्लेंड करा. आता ही पेस्ट मुलतानी मातीमध्ये मिक्स करा. हे सर्व नीट गाळून नंतर मिक्स करा. आता त्यात बेसन घालून मिक्स करा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर गुलाब पाण्याच्या मदतीने चेहरा स्वच्छ करा.

मसूर डाळ

रंग सुधारण्यासाठी तुम्ही मसूर डाळ वापरू शकता. यासाठी मसूर बारीक करून पावडर बनवा. नंतर या पावडरमध्ये थोडे दूध घाला. ते चांगले मिक्स करा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. हा फेस पॅक चेहऱ्यावरील काळेपणा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. थोडा वेळ ठेवल्यानंतर चेहरा धुवून घ्या.

तांदूळ

रंग सुधारण्यासाठी पॅक बनवत असाल तर २ टेबलस्पून फ्लेक्स सीड्स एक ग्लास पाण्यात १५ मिनिटे उकळा. आता हे तयार झालेले जेल गाळून घ्या. आता या जेलमध्ये २ चमचे तांदूळ पीठ घाला. मिक्स करून हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे राहू द्या. नंतर हा पॅक कोमट पाण्याने धुवा. या पॅकने चेहऱ्याचा रंग सुधारण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग