Rice Flour Face Pack for Instant Glow and Fairness: फक्त विवाहित स्त्रीयाच नाही तर कुमारिका सुद्धा हरतालिकेचे व्रत करतात. हा सण महिलांसाठी खूप खास असतो. विवाहित स्त्रीया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि सुखी वैवाहिक जीवन आणि मुलांसाठी कामना करतात. तर कुमारिका मुली महादेवासारखा पती मिळावा म्हणून व्रत करतात. यावर्षी हरतालिका ६ सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी महिला मुली सोळा श्रृंगार करतात आणि एकत्र महादेवाची पूजा करतात. तुम्हाला सुद्धा हरतालिकेच्या दिवशी सर्वात सुंदर दिसायचं असेल तर आतापासूनच त्याची तयारी सुरु करा. चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो आणि गोरेपणा हवा असेल तर हा होममेड फेस पॅक नक्की लावा. हा फेस पॅक लावल्याने तुमचा चेहरा चंद्रासारखा चमकेल. चला तर मग जाणून घ्या हा होममेड फेस पॅक कसा बनवायचा आणि लावायचा.
हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला एक चमचा तांदळाचे पीठ, १/२ चमचा एलोवेरा जेल, १/२ चमचा मध आणि २ चमचे दही आणि सुमारे ५-६ थेंब गुलाब जल लागेल.
आता हा फेस पॅक बनवण्यासाठी सर्व साहित्य चांगले मिक्स करा. याची गुळगुळीत पेस्ट बनवा. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १५ ते २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. या पॅकचा नियमित वापर करा. हे लावल्याने त्वचा स्वच्छ होते.
त्वचा स्वच्छ करण्यासाठी तांदूळ सर्वात बेस्ट आहे. यामध्ये एलोवेराचा वापर केला जातो. अशा वेळी हे त्वचेसाठी खूप फायदेशीर असून त्वचेला मॉइश्चराइझ करण्यासाठी उत्तम आहे. त्याचबरोबर दही नैसर्गिक क्लिंजरसारखे सुद्धा काम करते. अशा परिस्थितीत तुम्ही जर हा फेस पॅक नियमित वापरला तर तुम्हाला खूप फायदा होईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)