Rice Flour Face Pack for Instant Glow: यावर्षी १९ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार असून आता १९ तारखेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. एवढ्या कमी वेळात तुमच्या चेहऱ्यावर चमक हवी असेल तर उरलेल्या दिवसांत लगेच हा खास फेस पॅक चेहऱ्यावर लावा. उन्हामुळे होणारी सर्व टॅनिंग संपेल. तसेच एक्ने आणि मुरुमांचे डागही कमी होतील. जाणून घ्या कोणता आहे तो फेस पॅक.
कोरियन स्किन फेस मास्क खूप व्हायरल होतात. त्यासाठी तांदळाचे पाणी वापरले जाते. तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या स्क्रबने चेहरा स्वच्छ करा आणि त्वचेवर नैसर्गिकरित्या मॉइश्चराईझ मिळवा. फेस पॅक तयार करण्यासाठी तांदळाच्या पिठात या गोष्टी मिक्स करा. ज्यामुळे चेहऱ्यावर चमकही भरपूर दिसेल.
तांदळाच्या पिठाने स्क्रब केल्याने त्वचेला नैसर्गिक ऑइश्चर मिळतो. ज्यामुळे त्वचा चमकू लागते. फेस पॅक बनवण्यासाठी या गोष्टींचा वापर करा.
- दोन चमचे तांदळाचे पीठ
- दोन चमचे हळद
- एलोवेरा जेल
- दोन चमचे टोमॅटोचा रस
या सर्व गोष्टी नीट मिक्स करून पेस्ट तयार करा. त्यानंतर सकाळी चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर हलक्या हातांनी मसाज करून ते चेहऱ्यावरून काढा. पाण्याने स्वच्छ धुवून चेहऱ्यावरील सर्व फेस पॅक स्वच्छ करा. त्यानंतर चांगले मॉइश्चरायझर लावा. रोज फेस वॉशऐवजी हा फेस पॅक ४-५ दिवस लावल्यास फरक चेहऱ्यावर दिसेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)