Ayurvedic Cream for Glowing, Healthy, Young Skin: प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसण्याची इच्छा असते. आपली त्वचा हेल्दी आणि स्मूथ ठेवण्यासाठी लोक लाखो उपाय करतात. आजकाल बाजारात विविध प्रकारची कॉस्मेटिक प्रोडक्ट उपलब्ध आहेत, जे बनवणाऱ्या कंपन्या दावा करतात की यामुळे त्वचा स्मूथ, निरोगी आणि चमकदार राहील. पण या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये अशी अनेक केमिकल्स आढळतात, जी कुठेतरी हानिकारक असतात, हे सर्वांनाच माहित आहे. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी आयुर्वेदाने तुपापासून बनवलेल्या 'शतधौत घृत' नावाच्या क्रीमचे वर्णन केले आहे, जे आपल्या त्वचेसाठी अमृतापेक्षा कमी नाही. चला तर मग आज जाणून घेऊया ही आयुर्वेदिक जादुई क्रीम घरी कशी बनवायची.
'शतधौत घृत' म्हणजे शत म्हणजे १००, धौत म्हणजे धुणे आणि घृत म्हणजे तूप, याचा पूर्ण अर्थ आहे १०० वेळा धुतलेले तूप. 'शतधौत घृत' ही त्याच्या नावाप्रमाणे तयार केली जाते. त्यामुळे आयुर्वेदिक पध्दतीने शतधौत तयार करताना त्यात अनेक औषधेही घातली जातात, ज्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक आजारही दूर होतात. पण घरी कुठलेही औषध न वापरता सोप्या पध्दतीने बनवता येते.
घरी 'शतधौत घृत' बनवण्यासाठी तुम्हाला ५० ग्रॅम शुद्ध गाईचे तूप, सपाट पृष्ठभागाचे स्टीलचे भांडे, १०० मिली थंड पाणी आणि एक मोठा चमचा आवश्यक आहे. कमी गोष्टींबरोबरच ते बनवणं सुद्धा खूप सोपं आहे.
ते तयार करण्यासाठी प्रथम सपाट पृष्ठभागाच्या भांड्यात तूप काढावे. आता त्यात थंड पाणी घालून चमच्याने ढवळत मिक्स करा. पाण्याला थोडी उष्णता येईपर्यंत चमच्याने तूप आणि पाणी मिसळत रहा. यानंतर थोडा वेळ बाजूला ठेवा आणि नंतर चमच्याने ढवळत पुन्हा त्याच पद्धतीने पाणी मिक्स करा. आयुर्वेदात तूप १०० वेळा धुण्याची प्रक्रिया सांगितली आहे. पण घरी 'शतधौत घृत' बनवताना ही प्रक्रिया तुम्ही किमान ३० ते ४० वेळा पुन्हा करू शकता. पाणी वारंवार मिसळून घेतल्यास शेवटी लोणीसारखी पांढरी पेस्ट मिळेल, जी पाण्यापासून वेगळी करून एका भांड्यात साठवली जाते. हीच शताधौत घृतापासून बनवलेली क्रीम आहे.
त्वचेसाठी 'शतधौत घृत' एक उत्तम आयुर्वेदिक क्रीम आहे, ज्यामुळे त्वचा गुळगुळीत, निरोगी आणि चमकदार राहते. यासोबतच त्वचेशी संबंधित अनेक आजारही संपतात. हे चांगल्या मॉइश्चरायझरसारखे काम करते, ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते. त्वचेचे सौंदर्य वाढवण्याची ही पद्धत खूप जुनी आहे. ऋषीमुनींनी शतधौत घृत बनवायला सुरुवात केली. आजच्या काळात अनेक त्वचारोगतज्ज्ञही याचा वापर करण्याचा सल्ला देतात.
आयुर्वेदिक पध्दतीने तयार केलेले 'शतधौत घृत' दीर्घकाळ साठवता येते. पण त्वचा रोगतज्ज्ञांच्या मते घरगुती 'शताधौत घृत' दोन आठवडेच साठवून ठेवावे. यानंतर नवीन क्रीम बनवावी. त्वचा निरोगी आणि गुळगुळीत होण्यासाठी त्वचेवर क्रीम लावा आणि २० ते ३० मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर तुम्ही ती दिवसभर ठेवू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)