Mistakes To Avoid After Waxing: नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक अनेकदा त्वचेला वॅक्स करून घेतात. त्वचेला वॅक्सिंग केल्याने बाहेरची त्वचा स्वच्छ आणि सुंदर दिसते. त्वचेचे सौंदर्य सुधारण्यासाठी वॅक्सिंग हा एक सोपा आणि चांगला मार्ग आहे. मात्र वॅक्सिंगनंतर होणाऱ्या त्वचेच्या एलर्जीमुळे काही लोकांना त्वचेवर खाज सुटणे, पुरळ उठणे, रॅशेस येणे अशा समस्यांची तक्रार असते. वॅक्सिंग केल्यानंतर तुम्हालाही अशी समस्या येत असेल तर चुकूनही या वॅक्सिंग मिस्टेक करू नका. वॅक्सिंग केल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.
वॅक्सिंग नंतर कधीही गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करू नये. असे केल्याने आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे ती काळी होऊ शकते. त्वचेला वॅक्सिंग केल्यानंतर नेहमी थंड पाण्याने आंघोळ करावी.
अनेकदा मुली वॅक्सिंग केल्यानंतर लगेचच खरेदीसाठी उन्हात बाहेर पडतात. पण अशी चूक होता कामा नये. वॅक्सिंगनंतर उन्हात फिरणे टाळा. सूर्यप्रकाश थेट त्वचेवर पडल्यामुळे त्वचा काळी पडू शकते. बाहेर जाणे आवश्यक असल्यास प्रथम त्वचेवर चांगले सनस्क्रीन लावा.
वॅक्सिंग करताना पावडर त्वचेवर लावली जाते. पण फार कमी लोकांना माहित आहे की वॅक्सिंग करण्यासाठी पावडर जितकी आवश्यक असते, तितकीच ते केल्यानंतर त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे लागते.
वॅक्सिंगनंतर अनेकांना त्वचेवर जळजळ आणि खाज जाणवू लागते. जर तुमची अवस्था अशीच असेल तर त्वचेला खाज सुटण्याऐवजी कोरफड वापरा आणि पुरळ दूर. कोरफड त्वचेची जळजळ शांत करून त्वचेला थंड करण्याचे काम करते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)