Reasons of Acne and Pimples: त्वचेवर विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात. परंतु काही समस्या आहेत ज्या अगदी सामान्य आहेत, ज्यात एक्ने आणि पिंपल्स यांचा समावेश होतो. ही एक अतिशय सामान्य समस्या आहे, ज्याचा बहुतांश लोकांना सामना करावा लागतो. कडक ऊन, प्रदूषण, धूळ आणि मातीमुळे सुद्धा ही समस्या उद्भवू शकते. याशिवाय इतरही काही कारणे आहेत ज्यामुळे एक्ने आणि पिंपल्स होतात. आपण कळत नकळत अशा काही चुका करत असतो ज्यामुळे सुद्धा एक्ने आणि पिंपल्सची समस्या होते.
आपल्या चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे, विशेषत: खराब हातांनी, यामुळे त्वचेवर घाण, बॅक्टेरिया आणि तेल जमा होऊ शकते. ज्यामुळे छिद्रे बंद होऊ शकतात. अशा परिस्थितीत पुरळ दिसू शकते आणि त्वचेवर जळजळ होऊ शकते. तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करणे कमी करण्याचा प्रयत्न करा, खासकरून जर तुम्हाला मुरुमे होण्याची शक्यता असेल किंवा तुमची त्वचा संवेदनशील असेल.
जर तुम्ही मेकअप ब्रश रोज वापरत असाल आणि कालांतराने ते स्वच्छ केले नाही तर त्यावर बॅक्टेरिया, तेल आणि मेकअपचे कण जमा होऊ शकतात. घाणेरडा ब्रश वापरल्याने त्वचेची जळजळ, पुरळ आणि संसर्ग होऊ शकतो.
मोबाईल फोनमध्ये बॅक्टेरिया आणि घाण असू शकतात, विशेषतः जर ते चेहऱ्यासमोर धरले जातात. त्वचेवर दाब दिल्यास, हे जीवाणू चेहऱ्यावर जमा होऊ शकतात. ज्यामुळे पुरळ आणि त्वचेची जळजळ होते.
घाम, तेल आणि बॅक्टेरिया खराब उशीवर जमा होऊ शकतात, जे झोपताना तुमच्या त्वचेवर येऊ शकतात. यामुळे छिद्र बंद होऊ शकतात. यामुळे मुरुम आणि त्वचेची जळजळ होते. जर तुमची त्वचा ऑइली किंवा एक्ने प्रोन असेल तर तुमचे उशीचे कव्हर आठवड्यातून किमान दोन- तीन वेळा बदलावे.
स्किन केअर प्रोडक्ट्स हे त्वचा हेल्दी ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत. पण चुकीच्या प्रोडक्ट्सचा वापर करणे किंवा काही गोष्टींचा जास्त वापर केल्याने जळजळ आणि त्वचेशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. तुमच्या त्वचेचा प्रकार आणि समस्यांसाठी डिझाइन केलेली उत्पादने निवडा आणि नवीन उत्पादने तुमच्या चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या