Skin Care Mistakes: स्किन केअर मध्ये चुकूनही 'या' गोष्टींचा समावेश करू नका, त्वचेचं होईल मोठं नुकसान-skin care mistakes avoid these things to apply on your face ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care Mistakes: स्किन केअर मध्ये चुकूनही 'या' गोष्टींचा समावेश करू नका, त्वचेचं होईल मोठं नुकसान

Skin Care Mistakes: स्किन केअर मध्ये चुकूनही 'या' गोष्टींचा समावेश करू नका, त्वचेचं होईल मोठं नुकसान

Sep 24, 2024 02:53 PM IST

Skin Care Mistakes to Avoid: काही स्किन केअर टिप्स इतक्या प्रसिद्ध असतात की बहुतेक मुली विचार न करता चेहऱ्यावर त्यांचा वापर करत असतात. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी तुम्हीही अनेकदा टोमॅटो, काकडी, लिंबू चेहऱ्यावर लावत असाल तर या देसी टिप्स ट्राय करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा.

skin care mistakes: चेहऱ्यावर कोणत्या गोष्टी लावू नये
skin care mistakes: चेहऱ्यावर कोणत्या गोष्टी लावू नये (freepik)

Things to Avoid to Apply on Face: चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी आणि त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी महिला सोशल मीडियावर सांगितलेले अनेक प्रकारचे घरगुती उपाय घरी करून पाहत असतात. या टिप्स कोणतेही पैसे खर्च न करता आपली त्वचा कोमल आणि चमकदार बनविण्याचे वचन देतात. या टिप्सची विशेषता म्हणजे त्या इतक्या फेमस आहेत की बहुतेक मुली विचार न करता चेहऱ्यावर त्यांचा वापर करत असतात. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी तुम्हीही अनेकदा टोमॅटो, काकडी, लिंबू थेट चेहऱ्यावर लावत असाल तर या देसी टिप्स ट्राय करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा. काही गोष्टींचा चेहऱ्यावर चुकीच्या पद्धतीने वापर झाल्याने फायद्याऐवजी त्वचेचे नुकसान होऊ शकते.

स्किन केअर मध्ये समाविष्ट करू नका या गोष्टी

टोमॅटोचा रस

टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग सुधारतो, असे आपण अनेकदा लोकांना म्हणताना ऐकले असेल. टोमॅटोच्या रसामध्ये असलेले ब्लिचिंग एजंट त्वचा स्वच्छ करण्यास आणि तिला फ्रेश लुक देण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहित आहे का की टोमॅटोचा रस थेट चेहऱ्यावर लावल्याने टोमॅटोच्या रसात असलेले अॅसिड तुमच्या त्वचेचे पीएच खराब करू शकते आणि त्यात कोरडेपणा आणि जळजळ होऊ शकते.

साखर

अनेकदा मुली चेहरा स्क्रब करण्यासाठी स्वयंपाकघरात ठेवलेल्या साखरेचा वापर करू लागतात. पण हे करत असताना अनेकदा साखरेचे कण आपल्या त्वचेला स्क्रॅच करून नुकसान करतात. ज्यामुळे त्वचेची संवेदनशीलता आणखी वाढते.

बेकिंग सोडा

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बरेच लोक स्क्रब म्हणून बेकिंग सोडा वापरण्यास सुरवात करतात. पण असे केल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल काढून टाकल्याने चेहऱ्याची संवेदनशीलता वाढते. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि खराब होऊ शकते.

टूथपेस्ट

बऱ्याचदा मुरुमांवर उपचार करण्यासाठी टूथपेस्ट वापरली जाते. परंतु असे केल्याने त्वचेची जळजळ आणि सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. खरं तर टूथपेस्टमध्ये असणारी केमिकल्स त्वचेचं नैसर्गिक तेल काढून मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होण्याऐवजी वाढवू शकतात.

लिंबाचा रस

लिंबाचा रस हा एक नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आहे. हे बहुतेक लोकांना माहित आहे. परंतु आपणास हे देखील माहित आहे का की याचा रस थेट त्वचेवर लावल्यास आपल्या त्वचेची पीएच पातळी बिघडू शकते आणि अतिनील किरणांसाठी अधिक संवेदनशील होऊ शकते. ज्यामुळे सनबर्न आणि कोरडी त्वचा होण्याचा धोका वाढतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग