Skin Care Tips In Marathi: प्रत्येकाला आपला चेहरा स्वच्छ आणि डाग विरहित असावा अशी इच्छा असते. अनेकजण आपला चेहरा चमकवण्यासाठी विविध महागड्या ट्रीटमेंट घेतात. महागडे प्रॉडक्टस वापरतात. परंतु बऱ्याचवेळा इतकं सगळं करूनही काहीच उपयोग होत नाही. याउलट अनेकांचा चेहरा दुखावला जातो. विविध ऍलर्जी किंवा डाग येण्यासारखे प्रकार घडतात. त्यामुळे तुमचा चेहरा खराब होण्याची शक्यता असते. मात्र अशावेळी आयुर्वेदिक उपाय फायदेशीर ठरू शकतात. अजिबात खर्च न करता अगदी घरच्या घरी तुम्ही चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करू शकता. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येऊन तुम्ही तरुणही दिसू शकता.
आपला चेहरा निखळ आणि निरोगी ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. निरोगी आहार, योग्य हायड्रेशन, स्वच्छता, दैनंदिन त्वचेची निगा राखणे यांचा चेहऱ्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्वचा दीर्घ काळासाठी निरोगी राहते. शिवाय कोणत्याही केमिकल्स प्रॉडक्टसचा वापर न करता. काही नैसर्गिक उपाय करून तुम्ही तुमची त्वचा निरोगी आणि तरुण ठेवू शकता. यासाठी तुम्ही एलोवेरा जेल वापरू शकता. एलोवेरा जेल त्वचेसाठी अत्यंत लाभदायक आहे. कोरफडमुळे त्वचेला संपूर्ण पोषण मिळते. त्वचेत ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते. यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे त्वचेच्या अनेक समस्या जसे की डाग, मुरुम, अॅलर्जी इत्यादी दूर करतात. रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर अर्थातच एलोवेरा जेल त्वचेवर लावल्यास कोण कोणते फायदे होतात याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
बहुतांश स्त्रिया आणि मुली कामानिमित्त, कॉलेजनिमित्त घराबाहेर असतात. जेव्हा तुम्ही दिवसभर घराबाहेर राहता तेव्हा तुमचा चेहरा धूळ आणि घाणीने भरलेला असतो. त्यामुळे घरी आल्यांनतर किंवा रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. तुमचा चेहरा एलोवेरा जेलने स्वच्छ करू शकता. यासाठी एका बाउलमध्ये एलोवेराचे जेल घ्या आणि त्यात खोबरेल तेलाचे काही थेंब घाला. ते मिश्रण चांगले मिक्स करा आणि त्वचेवर लावा. त्यानंतर चेहेऱ्यावर हळुवार मालिश करा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते. त्वचेला भरपूर पोषणही मिळते.
एलोवेरा जेलचा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही एलोवेरा जेलमध्ये गुलाबजल मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावू शकता. गुलाबजल आणि एलोवेरा चेहऱ्यावर लावल्याने डाग, सुरकुत्या, मुरुम आणि मुरुमांमुळे पडणारे डाग दूर होतात. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन स्किन केअर रूटीनमध्ये एलोवेरा जेलचा समावेश केला तर तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकू लागेल. शिवाय तुम्ही वयापेक्षा अधिक तरुण दिसाल.
एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ राहू द्या. यामुळे नैसर्गिक चमक येते. एलोवेरा अर्थातच कोरफडमध्ये 'ॲलॉइन' नावाचा घटक असतो. हा घटक तुमच्या काळवंडलेल्या त्वचेचा रंग सुधारू शकतो. त्यामुळे तुमची टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते. तुम्ही एलोवेरा जेल चेहऱ्यावर लावून ते रात्रभर तसेच सोडू शकता. कारण ते काही वेळातच पूर्णपणे कोरडे होते आणि त्वचा खूप मऊ वाटते. किंवा तुम्ही काही तास ठेऊन ते धुवूनही टाकू शकता.
संबंधित बातम्या