Skin Care : पावसाळ्यात त्वचेवर पिंपल्स येत आहेत? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Skin Care : पावसाळ्यात त्वचेवर पिंपल्स येत आहेत? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा

Skin Care : पावसाळ्यात त्वचेवर पिंपल्स येत आहेत? ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jun 27, 2024 03:31 PM IST

Skin Care: पावसाळ्यात अनेकदा त्वचेवर फोड आणि पिंपल्स येतात. अशावेळी प्रभावी घरगुती उपाय करु शकता. ते कोणते चला जाणून घेऊया...

boils on skin
boils on skin (shutterstock)

पावसाळ्यात बुरशीजन्य व जिवाणू वाढण्याची शक्यता वाढते. ओले कपडे आणि आजूबाजूला असणारे दमट वातावरण याचा परिणाम त्वचेवर होतो. हवेत ओलावा असल्यामुळे घाम येणे, चेहरा तेलकट होण्याची समस्या निर्माण होते. या दोन्ही गोष्टींमुळे चेहऱ्यावर धूळ बसते. त्यामुळे कधीकधी त्वचेवर फोड किंवा पिंपल्स येतात. या पिंपल्समधून पिवळा पू बाहेर पडतो. हा पू बाहेर पडत असताना वेदना होतात. कधीकधी याचे काळे डाग देखील राहतात. हे असे पिंपल्स आल्यावर काय घरगुती उपाय करावे चला जाणून घेऊया...

पावसात हात, पाय, चेहरा, मांड्या किंवा शरीराच्या बाहेरील भागावर फोड किंवा पिंपल्स आले असतील तर ते बरे करण्यासाठी अत्यंत सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा. हे उपाय या पिपल्समधून पू काढून कोरडे करण्यास मदत करतात.
वाचा: रोजच्या आहारात चिया सीड्सचा करा समावेश, राहा आजारांपासून लांब

गायीचे शुद्ध देशी तूप आणि हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पिंपल्सवर लावा. एका रात्रीत पू बाहेर काढण्यास मदत होईल. पण ही पेस्ट कमीत कमी दोन ते तीन दिवस लावा. जेणेकरून पिंपलमधील पूर्ण पू बाहेर पडेल. असे केल्याने त्वचेवर डागही राहात नाहीत.
वाचा: गरोदरपणात सीट बेल्ट लावणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या कोणत्या चुका भारी ठरू शकतात

दुसरा उपायदेखील अगदी सोपा आहे आणि लहान फोड किंवा फोडवर एकदम गुणकारी आहे. पिंपल येत असल्याचे तुम्हाला जाणवताच गायीचे शुद्ध देशी तूप हलके गरम करून त्यावर लावा. दिवसातून कमीत कमी दोनदा लावा. असे केल्याने दोन दिवसात फोड गायब होईल आणि वेदनाही होणार नाहीत.
वाचा: रक्ताभिसरण सुधारून चेहऱ्याची चमक वाढवतात ही योगासने, जाणून घ्या कशी करायची?

कधीकधी हळद देखील गुणकारी ठरते. एक चिमूटभर हळद चमच्यामध्ये घ्या. ती थोडी गरम करा आणि फोड आलेल्या जागेवर चोळा. असे केल्याने तो फोड दुखायचा कमी होतो किंवा पिंपल्स कमी होतात. तसेच दुखतही नाहीत.

Whats_app_banner