Remedies to remove dark spots on face: वांग ही समस्या सध्या अनेक महिला आणि पुरुषांना भेडसावत आहे. मात्र, ही समस्या महिलांना अधिक प्रभावित करते. विशेषत: गर्भधारणेदरम्यान, बऱ्याच स्त्रियांना वांगची समस्या होऊ शकते. जी कालांतराने वाढू शकते. चेहऱ्यावर काळे किंवा तपकिरी डाग पडतात. काही लोकांमध्ये हे डाग लहान असतात. तर काही लोकांच्या चेहऱ्यावर मोठे डाग असतात. ज्यामुळे सौंदर्य कमी होते. वांगाची अनेक कारणे असू शकतात. ज्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक उपाय वापरून पाहू शकता. या नैसर्गिक घरगुती उपायांमुळे तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. शिवाय तुमच्या चेहऱ्याचा पोतही सुधारतो.
-उन्हाळ्यात वंगाची समस्या वाढते. याचे कारण म्हणजे उन्हाळ्यात लोक जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतात. ज्यामुळे वांगाची समस्या वाढू शकते. सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने चेहऱ्यावर मेलेनिनचे जास्त उत्पादन होते, ज्यामुळे मेलास्माची किंवा वांगाची समस्या वाढू शकते.
-अनेक वेळा गर्भनिरोधक गोळ्यांमुळेही महिलांमध्ये वंगाची समस्या उद्भवते. कारण गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. त्यामुळे मेलास्मा वांगची तक्रार होऊ शकते.
-याशिवाय तुमच्या कुटुंबातील एखाद्याला वांगाची समस्या असेल तर येणाऱ्या पिढीलाही वांगचा त्रास होऊ शकतो.
वांगाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, तुम्ही लिंबू वापरू शकता. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस काढा आणि नंतर हा रस कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर लावा आणि नंतर १ मिनिट मसाज करा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. लिंबाचा रस मेलास्मा वांगचे डाग हलके करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
वांग घालवण्यासाठी, आपण दुधासह हळदीची पेस्ट देखील वापरू शकता. यासाठी एक चतुर्थांश चमचा हळद दुधात मिसळून पेस्ट तयार करा आणि नंतर डागांवर लावा. ही हळदीची पेस्ट पूर्णपणे कोरडी झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. हळद, अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने वांग कमी करण्यासाठी प्रभावी ठरू होऊ शकते.
अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर वांगचे डाग कमी करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो. अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर त्वचेवर ब्लीचसारखे काम करतो. यासाठी कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावरील डागांवर अॅपल सायडर व्हिनेगर लावा आणि ते सुकल्यानंतर स्वच्छ करा.
वांगाचे डाग घालवण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरात मिळणारे दही आणि ताकसुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत. दही किंवा ताकात थोडीशी हळद टाकून, ती डागांवर लावून त्यावर हलक्या हाताने चोळून घ्यावे. नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून कमीत कमी २ ते ३ वेळा असे नियमित केल्यास तुम्हाला यापासून आराम मिळेल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)