Skin Care Tips Marathi: आजच्या काळात लोक फिटनेससोबतच सौंदर्यावरही विशेष भर देतात. सौंदर्य राखण्यासाठी विविध उत्पादने वापरत असतात. पूर्वीच्या काळात अनेक नैसर्गिक घटक असलेली उत्पादने मिळत होती. परंतु आता ती वेळ राहिलेली नाही. आता आपल्या स्किनकेअर उत्पादनांमध्ये फक्त नैसर्गिक घटक वापरले जात नाहीत. आजकाल, जलद परिणाम मिळविण्यासाठी आपल्या स्किनकेअर उत्पादनांमध्ये अनेक प्रकारचे केमिकलयुक्त घटक वापरले जातात. काही वेळा या गोष्टींमुळे अकाली वृद्धत्वाची लक्षणेही दिसून येतात. यातील बरेच घटक असे आहेत की, ते कर्करोग, त्वचा रोग, त्वचेशी संबंधित समस्यांसह इतर अनेक समस्यांना कारणीभूत ठरतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर तुम्ही आवर्जून टाळला पाहिजे.
वास्तविक सांगायचे झाले तर अल्कोहोलचे चांगले आणि वाईट असे दोन प्रकार आहेत. जर आपण वाईट अल्कोहोलबद्दल बोललो तर यामध्ये मिथेनॉल, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, प्रोपेनॉल, फिनाईल अल्कोहोल आणि अल्कोहोल डेनाइट यांचा समावेश होतो. जर या गोष्टी तुमच्या ब्युटी प्रोडक्ट्समध्ये असतील तर त्यामुळे तुमची त्वचा खूप कोरडी होऊ शकते. बऱ्याच वेळा तुमची त्वचेची चिडचिड होऊ शकते आणि सूज देखील येऊ शकते. जर तुम्ही अशी उत्पादने दीर्घकाळ वापरत असाल तर ते तुमच्या त्वचेच्या वरच्या पृष्ठभागाला नुकसान पोहोचवू शकते. कधीकधी यामुळे मोठ्या मुरुम आणि पुरळ देखील होऊ शकतात.
फेनॉक्सीएथिनॉल हा घटक प्रामुख्याने परफ्यूम, फेशियल मिस्ट आणि आवश्यक तेलांमध्ये वापरला जातो. हे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. तुम्ही ते चुकूनही तोडांत घालू नये, किंवा त्याचा थेट वास घेऊ नये किंवा त्वचेवर शोषून घेऊ नये. विशेषत: जर आपण नवजात बालकांबद्दल किंवा मातांबद्दल बोललो तर त्यांनी चुकूनही याचा वापर करू नये. याचा तुमच्या मेंदूवर आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. काहीवेळा हे तुमचे डोळे आणि त्वचेला जळजळ होण्याचे मुख्य कारण असू शकते.
जर तुम्हाला फॉर्मल्डिहाइड बद्दल माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा एक ज्वलनशील पण रंगहीन वायू आहे. हे तुमच्या लोशन आणि डिओडोरंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. जर ते जास्त प्रमाणात वापरले गेले तर तुम्हाला श्वासोच्छवासाच्या समस्या तसेच त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. काहीवेळा ते तुमच्या नाक आणि डोळ्यांसाठी देखील खूप हानिकारक असू शकते.
आज, पॅराबेन्सचा वापर अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो. मग ते सीरम, शॅम्पू किंवा फाउंडेशन असो. हा घटक वापरावा की नाही याबाबत नेहमीच वाद होत आले आहेत. परंतु जर तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल, तर तुम्ही तुमच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये हे न ठेवण्याचा प्रयत्न करावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)