नव्वदच्या दशकात बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय आणि आयकॉनिक गाण्यांना आवाज देणारी गायिका अलका याज्ञिक सध्या चर्चेत आहेत. या चर्चा अलका यांना कानाचा अतिशय दुर्मिळ असलेला सेन्सॉरीन्यूरल हियरिंग लॉस हा आजार झाला आहे. अलका यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. पण हा आजार नेमका काय आहे? हा आजार कशामुळे होतो? हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना मग जाणून घ्या..
सेन्सॉरीन्यूरल हियरिंग लॉस हा असा दुर्मिळ आजार आहे ज्यामध्ये रुग्णाच्या कानाच्या आतील मज्जातंतू किंवा कानाला मेंदूशी जोडणारे मज्जातंतू खराब झालेले असतात. त्यामुळे रुग्णाची ऐकण्याची क्षमता पूर्णपणे कमी होते. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
वाचा: 'हे' पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यावर होतात खराब, मास्टर शेफ पंकजकडून जाणून घ्या कारण
तणाव शरीराची शांत अवस्थेत परत येण्याची क्षमता रोखू शकतो, संभाव्यत: हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा रक्त प्रवाहात व्यत्यय आणणाऱ्या आरोग्याशी संबंधीत समस्या निर्माण होऊ लागतात. तसेच यामुळे कानाच्या आतील केसांच्या पेशींचे नुकसान होऊ शकते. कानाच्या पेशी कमकुवत असतात, म्हणून त्यांना स्थिर रक्त प्रवाहाची आवश्यकता असते. स्थिर रक्त प्रवाहाशिवाय, पेशी खराब होतात, ज्यामुळे आपल्या श्रवणशक्तीवर परिणाम होतो. सततच्या ताणामुळे हळूहळू श्रवणशक्ती कमी होऊ शकते. त्याचवेळी अचानक ऐकू येणे बंद होऊ शकते.
वाचा: गुडघेदुखीपासून आराम हवा? मग पंतप्रधान मोदींनी सांगितले पदहस्तासन नक्की करा
या आजारात कानाच्या आतील मज्जातंतूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. कधीकधी मेंदूला सिग्नल वाहून नेणाऱ्या मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे श्रवणशक्ती कमी होते. हळूहळू ऐकू येणे देखील बंद होते.
वाचा: मटण बिर्याणी शिवाय अपूर्ण आहे बकरी ईद! नोट करा सोपी हैदराबादी रेसिपी
हा आजार अनेकदा कायमस्वरुपाचा असतो. एकदा कानाच्या आतील केसांच्या पेशी खराब झाल्या किंवा नष्ट झाल्या की त्यांची दुरुस्ती करता येत नाही. एका अहवालात असे म्हटले आहे की योग्य उपचार केल्यामुळे बहुतेक लोकांची ऐकण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात सुधारली आहे. पण हा आजार पूर्णपणे बरा होत नाही.
संबंधित बातम्या