Kitchen Tips: रव्यामध्ये अळ्या, जाळी धरते का? फॉलो करा शेफ पंकजच्या या टिप्स-simple kitchen tips to prevent bugs and infestation in rava or semolina ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitchen Tips: रव्यामध्ये अळ्या, जाळी धरते का? फॉलो करा शेफ पंकजच्या या टिप्स

Kitchen Tips: रव्यामध्ये अळ्या, जाळी धरते का? फॉलो करा शेफ पंकजच्या या टिप्स

Mar 26, 2024 11:39 PM IST

Simple Kitchen Tips: रव्यामध्ये अनेक वेळा किडे, बारीक अळ्या, जाळी होते. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांच्या या टिप्स फॉलो करून तुम्ही रव्याचे कीटकांपासून संरक्षण करू शकता.

रव्यामध्ये किड लागू नये यासाठी टिप्स
रव्यामध्ये किड लागू नये यासाठी टिप्स (freepik)

Tips to Prevent Rava from Bugs: नाश्त्याचे विविध प्रकार असो वा शिरा रव्याचा अनेक प्रकारे वापर केला जातो. अनेकदा नाश्ता बनवण्यासाठी रव्यापासून झटपट पदार्थ बनवल्याने महिलांचे टेन्शन कमी होते. पण अडचण निर्माण तेव्हा होते जेव्हा असे आढळून येते की आधीच साठवलेल्या रव्यावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. जर तुमच्यासोबत असे कधी घडले असेल किंवा अनेकदा असे घडत असेल, तर मास्टर शेफ पंकज भदौरिया यांच्या या टिप्सचा अवलंब करून तुम्ही रव्याला कीटकांचा संसर्ग होण्यापासून वाचवू शकता. रव्याला कीटकांपासून संसर्ग होण्यापासून वाचवण्यासाठी मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर आजींच्या काळापासून प्रचलित असलेली अशीच एक रेमिडी शेअर केली आहे. चला जाणून घेऊया या टिप्स

रवा भाजून ठेवा

रवा किड्यांपासून वाचवण्यासाठी तो साठवण्यापूर्वी एका कढईत टाकून थोडा वेळ कोरडा भाजून घ्या. रवा हलका भाजल्यानंतरच तो थंड करून साठवा. असे केल्याने रव्यातील आर्द्रता सुकते आणि कीटक त्यात अजिबात प्रवेश करत नाहीत.

रव्याला किडींपासून वाचवण्यासाठी हे उपाय देखील अप्रतिम आहेत

कडुनिंबाची पाने

रवा हवाबंद डब्यात ठेवल्यानंतर त्यात १० ते १२ कडुलिंबाची पाने ठेवा. पण हे करताना कडुलिंबाच्या पानांमध्ये ओलावा नसावा हे लक्षात ठेवा.

पुदिन्याची पाने

रव्याला किड्यांपासून वाचवण्यासाठी तुम्ही त्यात पुदिन्याची सुकी पाने सुद्धा ठेवू शकता. पुदिन्याच्या वासामुळे कीटकांना रवा खाण्यापासून प्रतिबंध होतो.

तमालपत्र

किटकांपासून मुक्त होण्यासाठी तमालपत्राचा वापर देखील प्रभावी ठरू शकतो. रव्याच्या डब्यात तमालपत्र ठेवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग