मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies: दाढ दुखत असेल तर करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

Home Remedies: दाढ दुखत असेल तर करा हे घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

Feb 01, 2023 01:52 PM IST

Remedies to Stop Tooth Pain: दात-दाढ दुखणे जितके लहान दिसते तितके ते अधिक त्रासदायक असते. कधी कधी दुखणे स्वतःच बरे झाले तरी त्याचे इंफेक्शनमध्ये रुपांतर होते. यापासून मुक्त होण्यासाठी या घरगुती उपायांचा अवलंब करा.

दात आणि दाढदुखीसाठी घरगुती उपाय
दात आणि दाढदुखीसाठी घरगुती उपाय (unsplash)

Home Remedies To Get Instant Relief From Toothache: दातदुखीची समस्या सामान्य आहे. तसं तर अनेक वेळा वेदना हलकी असते तेव्हा ती स्वतःच बरी होते. परंतु ती पुन्हा इंफेक्शनचे कारण बनते. त्यामुळे ही समस्या खूप गंभीर बनते. दातदुखीमुळे बोलणे, खाणे, पिणे कठीण होते. कधी कधी वेदनांमुळे सूज देखील येते. अशा परिस्थितीत या वेदनापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

दात आणि दाढदुखीचा सामना करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा

कोमट पाण्यात मीठ

मीठ नैसर्गिक पद्धतीने कीटकांना मारण्यास मदत करते. दात आणि दाढदुखीचा सामना करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून गार्गल करा. ही खुप जुनी आणि फेमस रेमेडी आहे. दिवसभरात हे २-३ वेळा पुन्हा करा.

बेकिंग सोडा पेस्ट

दातदुखीचा सामना करण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जाऊ शकतो. यासाठी तुमच्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा टाका आणि दुखणाऱ्या दातांवर आणि दाढांवर लावा. असे केल्याने तुम्हाला त्वरित आराम मिळतो.

बर्फ मदत करते

जर अहवालांवर विश्वास ठेवायचा असेल तर बर्फ कोणत्याही प्रकारची सूज बरी करण्यासाठी चांगला आहे. गालाच्या बाजूला बर्फाचा पॅक लावा. हे दिवसातून २-३ वेळा पुन्हा करा.

लवंग

लवंगाचा वापर दात आणि दाढदुखीसाठी उत्तम आहे. दातदुखीवर तुम्ही लवंग खाऊ शकता किंवा लवंग तेल वापरू शकता. लवंगामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म संसर्ग कमी करण्यास मदत करतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग