Remedies for Constipation and Acidity: बदलत्या काळानुसार जीवनशैलीमध्ये झालेले बदल, खानपानाच्या बदलेल्या सवयी, जागरण आणि ताणतणाव या गोष्टींमुळे मानवी आयुष्यावर प्रचंड परिणाम होतात. अशा स्थितीत लोकांना अनेक आजार जडतात. हे आजार दिसायला लहान असले तरी ते तुम्हाला प्रचंड त्रासदायक ठरतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे पोटाचे विकार होय. पोट साफ न होणे, पचनक्रिया बिघडणे, संडासला जोर द्यावा लागणे, तासंतास टॉयलेटमध्ये बसूनही संडासला न होणे. अशा गोष्टी दिसून येतात. या गोष्टी जरी अनेकजण हसण्यावारी घेत असल्या, तरी त्या व्यक्तीला मात्र याचा भयानक त्रास जाणवतो. अशावेळी नेमके काय करावे ते आपण जाणून घेणार आहोत. आज आम्ही तुम्हाला सहजरित्या पोट साफ होण्याचे आणि पोटाच्या तक्रारी दूर होण्याचे काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
लिंबू भोजनात आस्वाद तर वाढतोच शिवाय अनेक औषधीय फायदेसुद्धा देतो. बद्धकोष्ठतासारख्या पोटाच्या तक्रारीवर लिंबू पाणी रामबाण उपाय ठरू शकते. त्यासाठी सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात लिंबू पिळून त्यात थोडे काळे मीठ घालून ते पाणी प्यावे . मात्र हे पाणी सकाळी उपाशी घेणेच फायदेशीर असते. असे केल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. पचनक्रिया सुधारून पोट साफ व्हायला मदत होते. शिवाय इम्युनिटी पॉवर वाढते.
अनेकांना गॅस आणि बद्धकोष्ठतेचा प्रचंड त्रास असतो. अशावेळी या लोकांनी दुधाचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते. दुधामध्ये शरीराला पोषक असणारे विविध घटक उपलब्ध आहेत. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात एक चमचा तूप मिक्स करून पिल्याने गॅस होण्याचे प्रमाण जवळपास नाहीसे होते. त्यामुळे सकाळी शौचास साफ होऊन पोटाच्या तक्रारी कमी होतात.
अनेकांना आरोग्याच्या तक्रारींमुळे लिंबू पाणी घेणे शक्य होत नाही. काहींना लिंबूपासून त्रास होतो. अशावेळी या लोकांनी पोट साफ होण्यासाठी सकाळची उठल्याबरोबर फक्त कोमट पाणी पिणे फलदायी असते. फक्त कोमट पाणी पिल्यानेसुद्धा पोटामध्ये प्रेशर निर्माण होऊन शौचास साफ होते. विशेष म्हणजे हे उपाय एकही रुपया खर्च न करता अगदी घरच्या घरी करता येतात.
बडिशोप आणि जिरा हे प्रामुख्याने आपल्या सर्वांच्याच स्वयंपाकघरात आढळतात. त्यामुळे या पदार्थांच्या सहाय्याने तुम्ही पोटाच्या तक्रारी दूर करू शकता. रात्री एका पेल्यात पाणी घेऊन त्यात बडिशोप आणि जिरा भिजत ठेवावा. सकाळी उठल्यानंतर ते पाणी उकळून घेऊन कोमट करून प्यावे. हे पाणी उपाशी पोट घेतल्याने आवश्यक ते फरक पाहायला मिळतात.
संबंधित बातम्या