पायात पैंजण घालण्यापासून ते बांगड्या आणि कानातल्या अंगठ्यांपर्यंत, आजकाल तरुणींमध्ये चांदीचे दागिने घालणे पुन्हा एकदा फॅशन स्टेटमेंट बनले आहे. चांदी धारण केल्याने फक्त त्या व्यक्ती लुकच वाढत नाही, तर आरोग्याशी संबंधित अनेक न ऐकलेले फायदे देखील मिळतात. जर आपण ज्योतिषशास्त्राबद्दल बोललो तर चांदीचा संबंध चंद्राशी आहे असे म्हटले जाते. असे म्हटले जाते की जर कुंडलीत चंद्र शुभ असेल तर ते चांगले आरोग्य राखण्यास देखील मदत करू शकते.
सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, चांदी केवळ फॅशन आणि ज्योतिषासाठीच नाही तर आरोग्याशी संबंधित फायदे मिळवण्यासाठी देखील धारण केली जाऊ शकते. चांदीचे दागिने धारण केल्याने आपल्याला कोणते आश्चर्यकारक आरोग्य फायदे मिळतात ते जाणून घेऊया.
चांदीमध्ये असलेले अँटी-एजिंग गुणधर्म त्वचेच्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. हे त्वचेचे आरोग्य सुधारून त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्याची समस्या कमी करण्यास मदत करते. इतकेच नव्हे तर चांदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म त्वचेवर हानिकारक बॅक्टेरियाची वाढ रोखण्यासाठीदेखील खूप मदत करतात. त्यामुळे त्वचेची सूज आणि लालसरपणाची समस्या कमी होते.
पूर्वीच्या काळी लोक शरीरावरील जखमा भरण्यासाठी चांदीचा वापर करत असत. आम्ही तुम्हाला सांगतो की, चांदीचे दागिने धारण केल्याने शरीरातील जखमा जलद भरण्यास मदत होतेच पण डागांची समस्यादेखील कमी होते.
चांदीच्या धातूमध्ये शक्तिशाली अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळेच चांदीचे दागिने घातल्याने सांधेदुखी आणि जडपणा यांपासून आराम मिळतो.
चांदी हे अशा रासायनिक घटकांपैकी एक आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि व्यक्ती निरोगी राहते. चांदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म बॅक्टेरिया आणि विषाणूपासून मुक्त होऊन सर्दी, फ्लू आणि संक्रमण टाळण्यास मदत करतात. चांदीचे ब्रेसलेट धारण केल्याने सर्दी आणि खोकल्याची समस्या दूर राहते आणि त्वचेशी संबंधित समस्यांपासून बचाव होतो.
चांदीला शीतलता देणारा धातू म्हटलं जातं. हे धारण केल्याने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता. चांदी धारण केल्याने मनाची चंचलता कमी होते. चांदी धारण केल्याने डोळ्यांशी संबंधित समस्या, ॲसिडिटी आणि शरीराची जळजळ दूर होण्यास मदत होते. चांदीच्या भांड्यांचा वापर केल्याने माणसाला मानसिक आजारांपासूनही आराम मिळतो.
चांदीचे दागिने धारण केल्याने मन शांत राहते आणि तणाव, चिंता आणि रागावर नियंत्रण मिळते. इतकंच नाही तर ऊर्जेची पातळी सुधारून झोपेशी संबंधित समस्या कमी करण्यास चांदी मदत करू शकते. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते.
चांदीचे दागिने परिधान केल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. चांदीच्या थंड गुणधर्मामुळे उन्हाळ्यात शरीराचे तापमान थंड ठेवण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)