Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात रात्री दिसणारी ही लक्षणं, सतर्क रहा
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात रात्री दिसणारी ही लक्षणं, सतर्क रहा

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकचे संकेत असू शकतात रात्री दिसणारी ही लक्षणं, सतर्क रहा

Jun 13, 2024 08:18 PM IST

Cardiac Arrest Symptoms: हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ओळखण्यात लोक अनेकदा चुका करतात. बऱ्याच वेळा ज्याला तुम्ही सामान्य समस्या मानता ते तुमच्यासाठी घातक ठरू शकते. तुम्हाला कधी सतर्क राहावे हे जाणून घ्या.

हार्ट अटॅकचे लक्षणे
हार्ट अटॅकचे लक्षणे ( unsplash)

Silent Symptoms of Heart Disease: जगभरात हृदयविकाराने मरणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. यापैकी बहुतेक मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयी, सक्रिय नसणे, दारु किंवा तंबाखूचे सेवन यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते. या सर्वांवर नियंत्रण ठेवल्यास हार्ट अटॅक किंवा हृदयविकार बऱ्याच अंशी टाळता येऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या वेळी दिसणारी काही लक्षणे पाहून सावध राहायला हवे.

छातीत दुखणे आवश्यक नाही

हृदयविकाराच्या वाढत्या घटना हा सर्वांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. डॉक्टरांच्या मते जीवनशैलीशी संबंधित निष्काळजीपणामुळे हृदयाचे आरोग्य बिघडू शकते. हार्ट अटॅकमध्ये वेदना केवळ छातीतच असेल असे नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. कधी कधी खांद्यामध्ये तीव्र वेदना, थकवा, घाम येणे इ. लक्षणे दिसतात.

ॲसिडिटीमुळे लक्षणे आढळतात

रात्री पोटात वरच्या बाजूने दुखत असेल, खांदे, पाठ, जबडा, मान किंवा घशात दुखत असेल तर सावध राहावे. महिलांना अनेकदा छातीच्या खाली मध्यभागी वेदना होतात. लोक याला ॲसिडिटी देखील मानतात. ॲसिडिटीमुळेही असा त्रास होऊ शकतो. पण जर तुम्हाला घाम येत असेल, धडधडत असेल किंवा थकवा येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

झोपताना घाम येणे

जर तुम्हाला झोपताना खूप घाम येत असेल तर हा हृदयाची समस्या देखील असू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याने तपासणी करून घ्यावी. श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दम लागणे, श्वास लागणे असा त्रास होणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते.

थकवा जाणवणे

हृदयविकार किंवा हार्ट अटॅक आल्यास हृदयाच्या बाबतीत अधिक मेहनत करावी लागते. ते प्रत्येक अवयवाला रक्त पुरवठा करते ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. तुम्हाला अनेकदा कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवत असेल, तरीही तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

पोटाच्या समस्या

पचनाशी संबंधित समस्यांना कधीही हलक्यात घेऊ नये. तुमचे एकंदर आरोग्य चांगले राहण्यासाठी पोट निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला वारंवार बद्धकोष्ठता किंवा अतिसार होत असल्यास, विशेषत: तुमचे वय ६० पेक्षा जास्त असल्यास संपूर्ण बॉडी चेकअप करून घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner