wet clothes: पावसाळ्यात बराच वेळ ओल्या कपड्यांवरच फिरताय? होऊ शकतो 'हा' त्रास! 'अशी' घ्या काळजी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  wet clothes: पावसाळ्यात बराच वेळ ओल्या कपड्यांवरच फिरताय? होऊ शकतो 'हा' त्रास! 'अशी' घ्या काळजी

wet clothes: पावसाळ्यात बराच वेळ ओल्या कपड्यांवरच फिरताय? होऊ शकतो 'हा' त्रास! 'अशी' घ्या काळजी

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 04, 2024 02:37 PM IST

Side effects of wearing wet clothes: पावसाळ्यात तासनतास ओले कपडे परिधान केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी.

Side effects of wearing wet clothes: पावसाळ्यात बराच वेळ ओल्या कपड्यांवर फिरु नये
Side effects of wearing wet clothes: पावसाळ्यात बराच वेळ ओल्या कपड्यांवर फिरु नये (shutterstock)

Side effects of wearing wet clothes during monsoon: पावसात भिजला आवडत नसेल असे क्विचितच कोणी तरी असेल. चेहऱ्यावर पडणारे पावसाचे थेंब केवळ शरीरभिजवत नाहीत तर मनही शांत करते. पावसाचे थेंब पाहिल्यानंतर अनेकांच्या आत दडलेले लहान मुल बाहेर येते आणि पावसात मजामस्ती करताना दिसते. पण तुम्हाला माहिती आहे का पावसात भिजल्यानंतर कपडे ओले होताता. हे कपडे फारवेळ घातले की आरोग्याशी संबंधीत समस्या होतात.

तुम्हालाही लहान मुलांप्रमाणे तासन्तास पावसाच्या पाण्यात भिजायला आवडत असेल किंवा आजकाल ऑफिसला जाताना अचानक आलेल्या पावसात भिजल्यामुळे तासनतास ओल्या कपड्यात बसून राहत असाल तर सावध व्हा. तुमची मौजमजा आणि सक्ती तुमच्या आरोग्यासाठी प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी घ्या. होय, पावसाळ्यात तासनतास ओले कपडे परिधान केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी.
वाचा: स्वयंपाकघरातील वस्तू पावसाळ्यात कशा सांभाळाव्यात? 'या' टिप्स येतील तुमच्या कामी!

ओले कपडे का घालू नयेत?

पावसाळ्यात बहुतेक वेळा धुतलेल्या कपड्यांमध्ये ओलावा असतो, वेळेअभावी अनेकजण दमट झालेले कपडे घालतात. हेच कपडे घालून ऑफिसला किंवा कामालाही जावे लागते. याशिवाय अनेकदा पावसात भिजल्यामुळे लोक तासनतास ओले कपडे घालून कार्यालयात बसतात. कारण काहीही असो, परंतु बराच वेळ ओले कपडे परिधान केल्याने एखाद्या व्यक्तीस त्वचा आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

पावसात ओले कपडे घालण्याचे तोटे

पावसात भिजल्यानंतर बराच वेळ ओले कपडे परिधान केल्याने आरोग्य बिघडू शकते. ओले कपडे शरीराला थंड करतात, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला सर्दी होऊ शकते. तसेच काहींना शिंका येणे आणि नाक वाहण्याची समस्या उद्भवू लागते.
वाचा: भारती सिंहने कसे केले १५ किलो वजन कमी? जाणून घ्या फिटनेस फंडा

यीस्टइन्फेक्शन, चिडचिड आणि पुरळ येणे

पावसात भिजल्यामुळे बराच वेळ ओले अंडरवेअर परिधान केल्याने योनीला जळजळ होणे, लालसरपणा येणे किंवा पुरळ येऊ शकतात.यामुळे योनिमार्गाच्या भागात यीस्टच्या संसर्गासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात. खरं तर ओल्या अंतर्वस्त्रांमुळे योनीच्या भागात असलेला ओलावा पीएच संतुलन बिघडवतो आणि सर्व प्रकारच्या इन्फेक्शनचा धोका वाढतो.

त्वचेचा संसर्ग

जास्त वेळ ओले कपडे परिधान केल्याने लालसरपणा, पुरळ, चिडचिड, खाज सुटणे अशा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्वचेवरील अशा कोणत्याही संसर्गापासून दूर राहण्यासाठी कपडे पूर्णपणे कोरडे घालावेत.
वाचा: 'ही' आहेत भारतातील सर्वात भीतीदायक ठिकाणे, जाण्यापूर्वी नक्की विचार करा

कमकुवत प्रतिकारशक्ती

पावसाळ्यात ओले कपडे परिधान केल्याने व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. कारण शरीरावरील ओलाव्यामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका वाढतो. ओलावा बॅक्टेरिया आणि इतर रोगजनकांच्या वाढीस प्रोत्साहित करू शकतो.

न्यूमोनिया

मुलांना पावसात बराच वेळ भिजणे आवडते. परंतु असे करताना परिधान केलेले ओले कपडे त्यांना न्यूमोनियाचा धोका निर्माण करू शकतात.

प्रतिबंधाच्या पद्धती

-पावसात भिजल्यानंतर लगेच घरी परतताच ओले कपडे बदलावे

-पावसाच्या पाण्यात भिजल्यानंतर कपडे बदलून गरम पदार्थ खावे. असे केल्याने शरीराचे तापमान सुधारू शकते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.

-रोगप्रतिकारशक्ती चांगली राखण्यासाठी आहारात भाज्या आणि फळांचा समावेश करा.

Whats_app_banner