मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Tea Side Effects: सकाळी उठल्याबरोबर चहा पिता का? आजच बदला सवय, आरोग्याचे होऊ शकते मोठे नुकसान

Tea Side Effects: सकाळी उठल्याबरोबर चहा पिता का? आजच बदला सवय, आरोग्याचे होऊ शकते मोठे नुकसान

Jun 25, 2024 01:05 PM IST

Drinking Tea on an Empty Stomach: जर तुम्ही सुद्धा चहा प्रेमी असाल आणि तुमची सकाळ चहासोबत होत असेल तर आजच तुमची सवय बदला. रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या गंभीर दुष्परिणामांबद्दल जाणून घ्या.

रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम
रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम (unsplash)

Side Effects of Drinking Tea on an Empty Stomach: आपल्याकडे चहाची जेवढी क्रेझ आहे तेवढी क्वचितच दुसऱ्या ड्रिंकची असेल. चहाप्रेमींची तर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही चहासोबतच होते. चहा आरोग्यासाठी चांगला नाही, असं कुणी कितीही म्हटलं तरी तो पिणाऱ्यांना काही फरक पडत नाही. काही प्रमाणात चहा नीट प्यायला तर फारसं नुकसान होत नाही, पण चुकीच्या वेळी चहा प्यायल्यास तो तुमच्या आरोग्यासाठी खूप भारी पडू शकतो. अशीच एक वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी उठल्याबरोबर चहा पिणे. जर तुम्हाला सुद्धा सकाळी उठल्याबरोबर चहा पिण्याची सवय असेल तर आधी त्यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दल जाणून घ्या.

पोटासाठी आहे हानिकारक

जर तुम्ही रिकाम्या पोटी चहा प्यायला तर यामुळे तुमच्या पोटाचे खूप नुकसान होऊ शकते. यामुळे अॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ज्यांना आधीच पोटाशी संबंधित आजार आहेत त्यांनी रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. खरं तर चहामध्ये अॅसिड असतं, त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी चहाचं सेवन केल्यास तुमच्या पोटात अॅसिडचं प्रमाण आणखी वाढतं.

ट्रेंडिंग न्यूज

दात किडण्याची शक्यता वाढते

जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर चहा पित असाल तर ही सवय तुमच्या तोंडासाठी अजिबात चांगली नाही. चहामध्ये नैसर्गिक आम्ल असते, ज्यामुळे दात वेगाने सडू लागतात. यासोबतच तोंडातून वास येण्याची समस्याही लक्षणीय वाढते. चहामध्ये टॅनिक अॅसिड असते त्यामुळे दात पिवळे आणि खराब दिसतात. मुलांना लहानपणापासूनच अशी सवय लागली असेल तर ते त्यांच्या ओरल हेल्थसाठी खूप धोकादायक ठरू शकते.

लोह आणि कॅल्शियमची कमतरता

दररोज रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरात लोह आणि कॅल्शियम दोन्हीची कमतरता निर्माण होऊ शकते. चहामध्ये टॅनिन आढळतात जे शरीरात लोह आणि कॅल्शियम याचे योग्य प्रकारे शोषण होऊ देत नाही. यामुळे शरीरात अॅनिमिया, थकवा आणि चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचबरोबर लोह आणि कॅल्शियमची कमतरता असल्याने आपल्या शरीरात वेगवेगळे आजारही होऊ शकतात.

कॅन्सरचा धोका वाढतो

जर तुम्हाला चहा प्यायला आवडत असेल तर आजच आपली सवय बदला. कारण या छोट्याशा व्यसनामुळे तुम्हाला कॅन्सरसारखा धोकादायक आजारही होऊ शकतो. सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो. दिवसातून पाच ते सहा कप चहा पिणाऱ्या पुरुषांमध्ये हे अधिक सामान्य असले तरी सकाळी रिकाम्या पोटी पिण्यामुळे हा धोका वाढतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel