Side Effects Of Honey: मधासोबत अजिबात खाऊ नयेत 'हे' ८ पदार्थ, फायद्याऐवजी आरोग्याला होईल नुकसान
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Side Effects Of Honey: मधासोबत अजिबात खाऊ नयेत 'हे' ८ पदार्थ, फायद्याऐवजी आरोग्याला होईल नुकसान

Side Effects Of Honey: मधासोबत अजिबात खाऊ नयेत 'हे' ८ पदार्थ, फायद्याऐवजी आरोग्याला होईल नुकसान

Nov 03, 2024 09:07 AM IST

what foods not to eat With honey: मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात.

side effects of honey
side effects of honey (pexel)

side effects of honey:  मध हे नैसर्गिक गोडाचे काम करते. विशेषतः ज्यांना साखरेपासून दूर राहायचे आहे त्यांच्यासाठी मध हा एक चांगला पर्याय ठरतो. मधाचे अनेक फायदे आहेत. त्यातील अँटिऑक्सिडेंट गुणधर्म शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. यामुळे जुनाट आजारांचा धोका कमी होतो. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि प्रतिजैविक गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे ते जखमेच्या उपचारांसाठी आणि संक्रमणास प्रतिबंध करण्यासाठी उपयुक्त ठरतात. परंतु काही गोष्टी अशा आहेत ज्यांच्यासोबत मध खाणे अत्यंत चुकीचे आहे. असे केल्यास तुम्हाला फायदा मिळण्या ऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. पाहूया ते पदार्थ नेमके कोणते आहेत.

तूप किंवा लोणी-

मधासोबत तूप किंवा लोणी कधीही खाऊ नये. कारण मध आणि तूप दोन्ही घट्ट असल्याने ते एकत्र खाल्ल्याने पचायला वेळ लागतो. यामुळे पोट फुगणे किंवा जडपणा जाणवू शकतो.

अंडी-

मध आणि अंडी एकत्र खाऊ नयेत. दोघांचा स्वभाव उष्ण आहे. त्यामुळे ते वेगळे खावे. यांचं एकत्र सेवन केल्याने पोटात अल्सर होऊ शकतो.

मोहरी-

अगदी मोहरीसोबत मध खाण्यास मनाई आहे. मोहरीच्या हिरव्या भाज्या, काळी मोहरी, पिवळी मोहरी, मोहरीच्या तेलासोबत मधाचे सेवन करू नये. उन्हातून परत आल्यानंतरही मधाचा वापर करू नये.

गरम पाणी-

मध जास्त गरम पाण्यात गेल्यावर त्याचे फायदे नाहीसे होतात. त्यामुळे याचा वापर फार गरम अन्न किंवा पाण्यात करू नये. तुम्ही ते कोमट पाण्यात वापरू शकता.

दूध-

तुम्ही अनेकांना मध मिसळून दूध पिताना पाहिलं असेल. पण गरम दूध मध मिसळून प्यायल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे गरम दूध आणि मधाचे सेवन करू नका.

चहा किंवा कॉफी-

चहा किंवा कॉफीमध्ये साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास ते धोकादायकही ठरू शकते. चहा किंवा कॉफीसोबत मधाचे सेवन केल्याने शरीराचे तापमान वाढते आणि त्यामुळे अस्वस्थता आणि तणावही होतो.

मुळा-

मध आणि मुळा खाल्ल्याने शरीरात विषारी संयुगे तयार होतात. ज्यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते. एखादी ऍलर्जी होण्याची शक्यता असते.

दारू-

मध आणि अल्कोहोल एकत्र मिसळून प्यायल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात. या दोघांचे मिश्रण तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे उलट्या आणि निर्जलीकरण होत असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले आहे.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner