Rice Side Effects : रोज भात खाल्ल्यास वाढू शकतो 'या' ५ गंभीर आजारांचा धोका! भातप्रेमींनो 'या' गोष्टींकडे लक्ष द्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Rice Side Effects : रोज भात खाल्ल्यास वाढू शकतो 'या' ५ गंभीर आजारांचा धोका! भातप्रेमींनो 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

Rice Side Effects : रोज भात खाल्ल्यास वाढू शकतो 'या' ५ गंभीर आजारांचा धोका! भातप्रेमींनो 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

Dec 09, 2024 03:24 PM IST

Boiled Rice Side Effects : जर तुम्हीही अशा लोकांपैकी एक असाल, ज्यांना रोज भात खाण्याची सवय आहे, तर तुम्हाला यामुळे होणाऱ्या नुकसानाबद्दलही माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग आज जाणून घेऊया जास्त भात खाण्याने कोणत्या आजारांचा धोका वाढतो.

Side Effects Of Eating White Rice : भात
Side Effects Of Eating White Rice : भात (Shutterstock)

Side Effects Of Eating White Rice : भारतीय खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर, जवळजवळ दररोज दोनच गोष्टी खाल्ल्या जातात, त्या म्हणजे गहू आणि तांदूळ. आपल्या जेवणात गरमागरम पोळी आणि भात प्रामुख्याने असतात. काही लोकांना भाकरी खायला आवडते, तर काही लोकांना भात खाण्याची इतकी सवय असते की, भात खाल्ल्याशिवाय त्यांचे पोट भरत नाही. मात्र, कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात खाणं चांगलं नाही. त्यामुळे रोज भात खात असाल, तर त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दलही तुम्हाला माहिती असायला हवी. आज आम्ही तुम्हाला अशा आजारांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा धोका जास्त भात खाल्ल्याने वाढू शकतो.

वाढतो मधुमेहाचा धोका

मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात तांदळाचा समावेश अत्यंत कमी प्रमाणात केला जातो. अनेकदा त्यांना तांदूळ टाळण्याचा सल्लाही दिला जातो. कारण तांदळाचा ग्लाइसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो, ज्यामुळे भात खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेची पातळी खूप वेगाने वाढते. अशा वेळी केवळ मधुमेहाच्या रुग्णांनीच नव्हे तर, साधारणपणे प्रत्येकाने जास्त भाताचे सेवन करणे टाळावे.

वाढू शकतो लठ्ठपणा 

रोज खाल्ल्या जाणाऱ्या पांढऱ्या तांदळात कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त असते. जर तुम्ही रोज भरपूर भात खात असाल तर यामुळे तुमच्या शरीरातील चरबी आणि लठ्ठपणा वाढू शकतो. याशिवाय भात खाल्ल्यानंतर थोड्याच वेळात तुम्हाला भूक लागू लागते, ज्यामुळे जास्त खाण्याची समस्याही वाढते. अशावेळी जर तुम्हाला तुमचं वजन नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर भात कमी प्रमाणात खा.

Eye Health: डोळ्यांचा चष्मा कायमचा काढून टाकतील हिवाळ्यात मिळणारी 'ही' फळे, आवर्जून खा

हृदयाशी संबंधित आजरांचा धोका

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज भात खाणे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील धोकादायक ठरू शकते. पांढऱ्या तांदळात पोषक तत्वं नगण्य असतात, तर फायबरचं प्रमाणही कमी असतं. त्यांना दररोजच्या आहारात समाविष्ट केल्याने ट्रायग्लिसेराइडची पातळी आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वेगाने वाढू शकते. हे सर्व हृदयाशी संबंधित समस्यांना प्रोत्साहन देऊ शकते. अशावेळी जर तुम्ही भातप्रेमी असाल तर तपकिरी किंवा लाल तांदूळ आपल्या आहाराचा भाग बनवू शकता.

मेटाबॉलिझम होईल कमकुवत

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दररोज तांदूळ खाल्ल्याने मेटाबॉलिझम सिंड्रोमचा धोका देखील वाढू शकतो. यामुळे चयापचय हळूहळू मंदावते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि पाचक समस्यादेखील उद्भवू शकतात. अशावेळी रोज भात खाण्याऐवजी तुम्ही कमी प्रमाणात त्याचे सेवन करू शकता. नियमित पांढऱ्या तांदळाऐवजी फायबरयुक्त तपकिरी तांदूळ आपल्या आहाराचा भाग बनवण्याचा प्रयत्न करा.

कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका

भात खाल्ल्याने थेट कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, याची पुष्टी कोणत्याही अभ्यासात झालेली नसली तरी रोज भात खाल्ल्याने शरीरात काही बदल होऊ शकतात, ज्यामुळे ट्रायग्लिसेराइड आणि बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी शरीरात वाढू शकते. अशावेळी जर तुम्हाला आधीच उच्च कोलेस्टेरॉलची समस्या असेल तर, भात खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner