Side Effects Of Eating Cold Food: बऱ्याचदा तुम्ही काही लोकांचे म्हणणे ऐकले असेल की, ते गरम अन्न खाण्याऐवजी थंड अन्न खाणे पसंत करतात. कधी ही निवड त्या व्यक्तीची सवय असते तर कधी बळजबरी असते. कारण काहीही असो, तुम्हाला माहिती आहे का की, थंड अन्न खाण्याची तुमची सवय तुम्हाला काही वेळातच आजारी बनवू शकते. पारंपारिक चायनीज मेडिसिन (TCM) नुसार, थंड अन्न खाल्ल्याने पोट फुगणे, आतड्यांना सूज येणे आणि मुरडा मारणे यासारख्या आतड्यांसंबंधी समस्या उद्भवू शकतात. विशेषत: महिलांसाठी थंड अन्न खाण्याचे जास्त दुष्परिणाम होतात.
थंड अन्न खाल्ल्याने माणसाला पोटाचा त्रास होऊ शकतो. तर गरम अन्नामुळे पोट खराब होण्याचा धोका कमी होतो. गरम अन्न शरीरात पोहोचते आणि सहज पचते. आम्ही तुम्हाला सांगतो की, काहीवेळा थंड अन्न खाल्ल्याने पोटात मुरडा मारू लागतो. ज्यामुळे तुम्हाला पोटात अतिशय वेदना होऊ शकतात. आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते.
थंड अन्न खाल्ल्याने शरीरातील चयापचय कमकुवत होऊ शकतो. तर गरम आणि ताजे अन्न खाल्ल्याने चयापचय क्षमता वाढू शकते. वास्तविक, थंड अन्न पोटात गरम करण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे कॅलरी बर्न होण्याची प्रक्रिया मात्र मंदावते. त्यामुळे वजन आटोक्यात आणण्याचा वेगही कमी होतो.
थंड अन्न खाल्ल्याने गॅस आणि ब्लोटिंग सारख्या समस्या उद्भवू शकतात. खरं तर, थंड अन्न, विशेषत: थंड भाताचे सेवन, गॅस आणि ब्लोटिंगची समस्या वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे शक्यतो जेवताना जेवण गरम असल्याची खात्री करून घ्यावी.
थंड अन्नामध्ये बॅक्टेरिया असू शकतात. गरम अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढू शकत नाहीत. थंड अन्नापेक्षा गरम अन्न अधिक पौष्टिक मानले जाते. अयोग्यरित्या साठवलेले थंड अन्न, विशेषत: तांदूळ, पुन्हा गरम केल्यावर बॅसिलस सेरियससारखे हानिकारक जीवाणू ठेवू शकतात. जे अन्नामध्ये विषारी पदार्थ तयार करून अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढवू शकतात.
थंड किंवा थेट फ्रिजमधून काढून अन्न खाल्ल्याने पचनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे अनेक वेळा शरीराचे वजनही वाढू लागते. खरं तर, खराब पचनामुळे, पोटातील अन्न वेळेवर पचत नाही आणि वजन वाढण्याचे कारण बनू लागते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल. किंवा वजन वाढू द्यायचे नसेल तर जेवताना अन्न पदार्थ नेहमीच गरम करून घेण्याची सवय स्वतःला लावा.