Side Effects of Eating Eggs: ' संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही म्हण तुम्ही लहानपणापासून ऐकत असाल. पण तुम्हाला माहित आहे का की ही म्हण प्रत्येक व्यक्तीला सूट होत नाही. होय, अंडी हा प्रथिनांचा सर्वात समृद्ध स्त्रोत मानला जातो. पण प्रथिनासोबतच कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स सारखे पोषक घटकही त्यात चांगल्या प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी अनेक आश्चर्यकारक फायदे देतात. आरोग्यासाठी इतकं फायदेशीर असूनही, तुम्हाला माहिती आहे का की अंड्यांचे जास्त सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर नसून गंभीर हानी पोहोचवू शकते. चला जाणून घेऊया अंडी खाण्याचे असेच काही दुष्परिणाम.
मेडी सर्कलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचा जीवाणू आढळतो. जर अंडी नीट उकळून खाल्ले नाहीत तर हे बॅक्टेरिया व्यक्तीच्या शरीरात शिरून आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.
अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असल्याने त्याचा मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो. यामुळेच किडनीच्या रुग्णांना याचे जास्त सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.
अंड्याचे जास्त सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते. जर तुम्ही अंड्यातील पिवळ बलक जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यातील चरबीमुळे तुमचे वजन वाढू शकते.
जर तुम्ही आधीच पचनाच्या समस्यांनी त्रस्त असाल तर चुकूनही अंडी जास्त प्रमाणात खाऊ नका. असे केल्याने तुमची समस्या आणखी वाढू शकते. खरं तर अंडी हेवी असल्यामुळे ते पचायला वेळ लागतो. त्यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या वाढू शकते. याशिवाय अंड्यांमधील प्रथिने देखील आतड्याच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आधीच पचनाशी संबंधित समस्या असतील तर अंडी फक्त मर्यादित प्रमाणातच खा.
जुलाब किंवा पोटदुखीच्या परिस्थितीतही अंडी खाऊ नयेत. अंड्याचा प्रभाव उष्ण असतो, ज्यामुळे पोट बिघडण्याची समस्या आणखी वाढू शकते.
प्रथिनांच्या अतिसेवनामुळे अनेकांना एलर्जी असते, अशा लोकांनीही अंडी मर्यादित प्रमाणात खावीत. अंड्यांमध् येप्रोटीनचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळे एलर्जीची समस्या वाढू शकते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)