Shravan Diet Food 2024: हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत महत्वाचा समजला जातो. या महिन्याला विशेष धार्मिक महत्व आहे. येत्या ५ ऑगस्टपासून श्रावण मासारंभ होत आहे. श्रावण महिना भगवान शंकराला अर्पण करण्यात आला आहे. याकाळात भगवान शंकराची पूजा केली जाते. शिवाय प्रत्येक सोमवारी लोक उपवास ठेवतात. उपवास धरून हे लोक देवाची पूजा करतात. अशात उपवास असणाऱ्यांना अनेकवेळा थकवा किंवा कमजोरी जाणवते. उपवास असणाऱ्यांनी श्रावणात काय खावे जेणेकरून त्यांची शक्ती वाढेल, थकवा दूर होईल हे आज आपण जाणून घेणार आहोत.
श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी लोक उपवास ठेवतात. किंवा इतर सणांच्या वेळीही लोक पूजा करतात तेव्हा उपवास करतात. त्यामुळे शरीराला काही प्रमाणात थकवा आणि अशक्तपणा जाणवण्याची शक्यता असते. शिवाय हवामानाचादेखील आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यासाठी आपण आपल्या शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून शरीरात ग्लुकोजची कमतरता भासू नये. कारण मेंदूला ग्लुकोजपासून ऊर्जा मिळते. मेंदू फक्त ग्लुकोज आणि सुक्रोज घेत असतो. अशा काळात तुम्ही उपवासात काय खाऊ शकता. तुमची ऊर्जा आणि शक्ती कोणत्या खाद्य पदार्थांमधून वाढवू शकता याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
थकवा, अशक्तपणा आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी आपण जास्तीत जास्त गोड पातळ पदार्थ घेणे गरजेचे आहे. नारळ पाणी, फळांचा रस, किंवा फळे इत्यादी गोड पदार्थ पुरेसे प्रमाणात घेतले पाहिजेत. याव्यतिरिक्त, पुरेसे पाणी देखील घेतले पाहिजे. साधारणपणे उपवासात भाजी, भाकरी, भात असे पदार्थ खाल्ले जात नाहीत. त्यामुळे या गोष्टी शरीरातील ऊर्जेची कमतरता भरून निघते.
श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवशी स्वतःला ऊर्जात्मक आणि उत्साही ठेवण्यासाठी आपल्या आहारात फळे, दुग्धजन्य पदार्थ तसेच काही कंदमुळांचादेखील समावेश करणे उत्तम असते. याकाळात तुम्ही गहू किंवा तांदूळसारखे पदार्थ खाऊ शकत नाही. त्यामुळेच याकाळात तुम्ही शिंगाडा किंवा राजगिऱ्याच्या पिठापासून बनणारे विविध पदार्थ खाऊ शकता. या पदार्थांमुळे तुम्हाला ऊर्जात्मक वाटेल. शरीरातील ऊर्जेची गरज पूर्ण होईल. सध्या सोशल मीडियावर राजगिरा आणि शिंगाडापासून बनणारे विविध पदार्थ पाहायला मिळत आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे कोणतेही पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकता.
फळांबाबत सांगायचे झाले तर तुम्ही उपवासात विविध फळे खाऊ शकता. फळे तुम्हाला फ्रेश आणि निरोगी ठेवण्यास मदत करतील. शिवाय तुम्ही फळाचे ज्यूससुद्धा पिऊ शकता. खासकरून नारळाच्या पाण्याचा आपल्या आहारात समावेश करा. त्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त पाण्याची गरज पूर्ण होईल. याशिवाय तुम्ही रताळे,बटाटा, अरबी असे कंदमुळेसुद्धा खाऊ शकता. यापासूनसुद्धा अनेक तळणी-भाजणीचे पदार्थ बनवता येतील. शक्यतो तेलकट पदार्थ करण्यापेक्षा यापासून भाजणीचे पदार्थ करणे उत्तम ठरते.त्यासोबतच श्रावणात दुग्धजन्य पदार्थसुद्धा घेणे सोयीचे असते. जेणेकरून तुमच्या शरीरात त्राण राहील. तुम्हाला थकवा आणि कमजोरी जाणवणार नाही. आपल्या शरीरातील कॅल्शिअमची गरज भागवण्यासाठी तुम्ही दुधापासून बनलेले पदार्थ अर्थातच दही, ताक, तूप, चीज यांचा आहारात समावेश करू शकता.
संबंधित बातम्या