Shravan 2024: कोल्हापुरातील 'हे' शिवमंदिर तुम्ही कधी पाहिलंय का? श्रावणातल्या वीकेंडला नक्की देऊ शकता भेट!-shravan 2024 this weekend you can visit the kopeshwar temple of khidrapur near kolhapur ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shravan 2024: कोल्हापुरातील 'हे' शिवमंदिर तुम्ही कधी पाहिलंय का? श्रावणातल्या वीकेंडला नक्की देऊ शकता भेट!

Shravan 2024: कोल्हापुरातील 'हे' शिवमंदिर तुम्ही कधी पाहिलंय का? श्रावणातल्या वीकेंडला नक्की देऊ शकता भेट!

Aug 22, 2024 10:43 AM IST

Traveling in the month of Shravan: श्रावणात लोक विविध धार्मिक ठिकाणांना भेटी देतात. त्यातल्या-त्यात भक्त आपल्या आसपास असणाऱ्या शिव मंदिराला भेट देत असतात.

Shravan 2024: कोल्हापूरजवळील खिद्रापूर येथे असलेले कोपेश्वर मंदिर
Shravan 2024: कोल्हापूरजवळील खिद्रापूर येथे असलेले कोपेश्वर मंदिर

Khidrapur Kopeshwar Temple:  हिंदू धर्मात पवित्र असणारा श्रावण महिना सध्या सुरु आहे. श्रावण महिना भगवान शिवला अर्पण करण्यात आला आहे. या महिन्यात भक्त महादेवाची पूजा करतात, उपवास ठेवतात. श्रावणात लोक विविध धार्मिक ठिकाणांना भेटी देतात. त्यातल्या-त्यात भक्त आपल्या आसपास असणाऱ्या शिव मंदिराला भेट देत असतात. श्रावण सोमवार असो किंवा शनिवार रविवार अनेकजण धार्मिक सहलीला जाण्याचा विचार करत असणार. त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी एक खास माहिती आणली आहे. या श्रावण सोमवाराला किंवा विकेंडला तुम्ही एखाद्या शिव मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

देशभरात अनेक शिव मंदिर आहेत. या मंदिरात दररोज भक्तांच्या भल्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. विशेष काही असेल तर मग सांगायलाच नको, भक्त दूर दूरहून दर्शनासाठी येतात. आज आपण असेच कोल्हापुरातील एक अतिशय प्राचीन शिव मंदिर पाहणार आहोत. हे शिव मंदिर फारच प्राचीन असून अगदी विदेशातूनसुद्धा लोक येथे भेट द्यायला येतात. या मंदिराची रचनाच इतकी कलात्मक आहे की, लोक पाहताच त्यांना येथे जाण्याची भुरळ पडते. हे मंदिर इतर कोणते नसून कोल्हापुरातील खिद्रापूर याठिकाणी स्थित असणारे कोपेश्वर मंदिर होय.

भारतमध्ये अनेक धार्मिक वास्तू आहेत. ज्या पाहून लोकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. या वास्तूंकडे पाहून आजही संशोधकांना आश्चर्य वाटते की, ही इतकी गुंतागुंतीची वास्तू वास्तुकलेने कशी बांधली गेली. महत्वाचं म्हणजे हजारो वर्षांपूर्वी यंत्रे नव्हती, सर्व बांधकाम हातानेच केले जात होते. तरीसुद्धा या वास्तू इतक्या सुबक आणि आकर्षक आहेत. यातीलच एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील कोल्हापूरजवळील खिद्रापूर येथे असलेले कोपेश्वर मंदिर होय. या मंदिराची वास्तुकला ही साधी रचना नसून त्यात अनेक रहस्ये दडलेली आहेत. जी आजही एक गूढच आहेत. हे पाहून तुम्हाला थ्रीडी फिल्म्सची आठवण येईल. जणू एखादे दृश्य अगदी जवळून गेले आहे. त्याची भव्यता आजही कोणत्याही प्रकारे कमी झालेली नाही.

कोपेश्वर मंदिराचा इतिहास-

प्राचीन काळातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर चालुक्य राजवटीतील उत्कृष्ट वास्तुकला प्रदर्शित करते. हे मंदिर चालुक्यांनी बांधलेल्या इतर वास्तूंइतकेच प्रसिद्ध आहे. या मंदिराची वास्तूच इतकी आकर्षक आहे, की लोक तेथे जाण्यास आकर्षित होतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेले हे मंदिर १२व्या शतकात (इ.स. ११०९-७८ दरम्यान) शैलहार राजवंशातील राजा गंधरादित्य याने बांधले होते. कृष्णा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. यंदाच्या श्रावणात तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता.

कोल्हापूरपासून किती अंतरावर आहे हे मंदिर?

आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, खिद्रापूर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातले एक गाव आहे. हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. ते कोल्हापूरपासून अंदाजे ८० किलोमीटर अंतरावर आहे. तर नृसिंहवाडी अर्थातच नरसोबाच्या वाडीपासून अदाजे २४ किलोमीटरवर आहे. याठिकाणी तुम्ही खाजगी गाडीने जाऊ शकता. शिवाय कोल्हापूरमधून एसटीने शिरोळ किंवा नरसोबाच्या वाडीला जाऊन तिथून तेथे पोहचू शकता.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)