Names of babies born in Shravan: श्रावण महिना सुरू झाला आहे. लोक या ऋतूचा पुरेपूर आनंद घेत आहेत. हा महिना भगवान शिवला अर्पण केलेला आहे. म्हणूनच या महिन्यात महादेवाची भक्तिभावाने आराधना केली जाते. लोक श्रावणाचे उपवास करतात. अर्थातच हिंदू धर्मात श्रावण महिना खूप शुभ मानला जातो. आणि या महिन्यात जन्मलेली मुलेदेखील खूप खास असतात. जर तुमच्याही डिलिव्हरीची तारीख श्रावणात असेल किंवा तुम्हाला श्रावणामध्ये मुल झालं असेल, तर तुम्ही तुमच्या मुलांची श्रावणाशी संबंधित नावे ठेऊ शकता. आम्ही आज देत असलेल्या नावांचा अर्थ वारा, आकाश, पाऊस असा होतो जे सहसा श्रावण महिन्याशी संबंधित असतात. तुम्हालाही ही नावे नक्कीच आवडतील.
श्रावणात जन्मलेल्या मुलीचे नाव शिवांगी ठेऊ शकता. शिवांगीचा अर्थ भगवान शिवच्या शरीराचा अर्धा भाग होय. ज्या मुलीचे नाव शिवांगी असते तिच्या आयुष्यात नेहमीच भगवान शिवचा आशीर्वाद असतो.
शिविका हेसुद्धा अतिशय सुंदर नाव आहे. या नावाचा अर्थ भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. हे माता पार्वतीच्या विविध नावांपैकी एक आहे. तुम्ही आपल्या मुलीचे नाव शिविका ठेवल्याने तिच्यावर भगवान शंकराची कृपा सदैव राहते.
हिंदू धर्मातील मुलींसाठी हे एक अतिशय सुंदर नाव आहे. या नावाचा अर्थ भगवान शिवाचा अंश असणारा असा होतो. हे नाव ठेवल्यास तुमच्या मुलीवर आयुष्यभर भगवान शिवची कृपादृष्टी राहते.
श्रावणात जन्मलेल्या मुलींसाठी शैलजा हे एक अतिशय खास नाव आहे. शैलजा हे माता पार्वतीच्या अनेक नावांपैकी एक आहे. हे नाव ठेवल्याने तुमच्या मुलीला भगवान शिवसोबत माता पार्वतीचाही आशीर्वाद लाभतो.
'नील' हे आयरिश नाव आहे. ज्याचा अर्थ "आकाश" आहे. हे सर्वात जास्त पसंत केल्या जाणाऱ्या नावांपैकी एक आहे. पन्नासच्या दशकात हे नाव फारच प्रचलित होते. नील आर्मस्ट्राँग या नावाचा एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. जर तुमच्या मुलाचा जन्म श्रावण महिन्यात झाला असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाव नील ठेवू शकता.
तुम्ही तुमच्या श्रावणात जन्मलेल्या गोंडस मुलाला मेघ हे नाव देऊ शकता. याचा अर्थ आकाश असा होतो. हे नाव फारच सुंदर आहे.
ज्या लोकांना श्रावण महिना प्रचंड आवडतो, ते लोक त्यांच्या मुलाचे नाव 'रमण' ठेवू शकतात. रमण म्हणजे 'मजा' होय. श्रावण महिन्यात पाऊस आणि आल्हाददायक हवामान पाहून प्रत्येकजण मजा करतो.
श्रावणात जन्म झालेल्या मुलाचे नाव तुम्ही अनंत असेही ठेऊ शकता. अनंत या नावाचा अर्थ ज्याचा कधीही अंत होत नाही. हे नाव चक्रीवादळचे प्रतिनिधित्व करते असे सांगितले जाते.
तुम्ही तुमच्या मुलाचे नाव आकाश ठेवू शकता. आकाश हे एक लोकप्रिय हिंदू नाव आहे. ज्याचा अर्थ आभाळ-ढग असा आहे.