Kesar Piyush Recipe: महाराष्ट्रात सध्या श्रावण महिना सुरु आहे. हा महिना भगवान शिवला अर्पण करण्यात आला आहे. याकाळात लोक भक्तिभावाने महादेवाची पूजा करतात. शिवाय याकाळात उपवासदेखील करतात. उपवासाला अनेक गोष्टी आहारातून वर्ज्य केल्या जातात. तर अनेक प्रकारचे नवनवीन पदार्थ उपवासाला बनवले जातात. खासकरून विविध स्वीट डिश बनवल्या जातात. महिला वर्गाला दरवेळी नवीन काय बनवायचे हा प्रश्न पडलेला असतो. बऱ्याचवेळा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तुम्हालासुद्धा तेच तेच पेय बनवून कंटाळा आला असेल. तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास थंडगार आणि स्वादिष्ट पेय घेऊन आलो आहोत.
केसर पियुष हे एक स्वादिष्ट आणि मलईदार पेय आहे. जे पश्चिम भारतातील महाराष्ट्रीयन आणि गुजराती पाककृतींमध्ये आवर्जून पाहायला मिळते. पियुष हे पेय लस्सीसारखेच आहे. पण लस्सीच्या तुलनेत ते लस्सीपेक्षा घट्ट, मलईदार आणि गोड असते. महाराष्ट्राचं पेय म्हणून ओळखलं जाणारं हे पियुष चवीला तर उत्तम आहेच पण, आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उत्तम आहे.
-३ कप गोदरेज जर्सी कर्ड
- पाऊण कप साखर
-अर्धा कप बर्नयार्ड बाजरी, मऊ होईपर्यंत शिजवलेली
-अर्धा चमचा के सर, पाण्यात भिजवलेले
-अर्धा चमचा वेलची पूड
-जायफळ पूड, चिमूटभर
-शिजवलेली बर्नयाडी ज्वारी घ्या आणि २ कप थंड पाणी वापरून ब्लेंडरमध्ये बारीक करा.
- आता हे मिश्रण एका पातळ कपड्यातून गाळून घ्या. बर्नयार्ड ज्वारीचे दूध तयार आहे.
-स्वच्छ ब्लेंडरमध्ये गोदरेज जर्सी कर्ड, बर्नयार्ड ज्वारीचे दूध, साखर, केसर, वेलची पूड, कुटलेले जायफळ घालून स्मूदीसारखे घट्ट होईपर्यंत वाटा.
-एका उंच ग्लासमध्ये आवडीप्रमाणे बर्फ घालून सर्व्ह करा.