मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Sunday Brunch: हिवाळ्यात खूप टेस्टी लागतात गरमागरम छोले भटूरे, संडे ब्रंचसाठी परफेक्ट आहे ही अमृतसरी रेसिपी

Sunday Brunch: हिवाळ्यात खूप टेस्टी लागतात गरमागरम छोले भटूरे, संडे ब्रंचसाठी परफेक्ट आहे ही अमृतसरी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 28, 2024 12:41 PM IST

Weekend Special Recipe: रविवारच्या सुट्टीच्या दिवशी काहीतरी स्पेशल खायचे असेल तर तुम्ही अमृतसरी छोले भटुरेची ही रेसिपी ट्राय करू शकता. ब्रंचसाठी ही एकदम परफेक्ट आहे.

अमृतसरी छोले भटुरे
अमृतसरी छोले भटुरे (freepik)

Amritsari Chole Bhature Recipe: हिवाळ्यात गरमागरम छोटे भटुरे खायची मजाच वेगळी असते. तुम्ही रविवारच्या ब्रंचसाठी अमृतसरी छोले भटुरेची ही रेसिपी ट्राय करू शकता. रविवारी बरेच लोक सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण एकाच वेळी घेतात. तुम्ही सुद्धा ब्रंचसाठी काहीतरी चटपटीत खायचा विचार करत असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. या रेसिपीची आणखी एक विशेषता म्हणजे तुम्ही हे डिनरसाठी सुद्धा बनवू शकता. ही रेसिपी इतकी टेस्टी आहे की तुम्हाला प्रत्येक वीकेंडला बनवायला आवडेल. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घ्या अमृतसरी छोले भटुरे कसे बनवायचे.

अमृतसरी छोले भटुरे बनवण्यासाठी साहित्य

- २ कप छोले

- २ कप मैदा

- १/२ कप गव्हाचे पीठ

- २ कांदे तुकड्यांमध्ये कापलेले

- १ टीस्पून लसूण

- १ टीस्पून आले

- १ टोमॅटो तुकडे

- १ जुडी कोथिंबीर

- चहापत्ती

- सुका आवळा

- १ टीस्पून यीस्ट

- १/२ टीस्पून साखर

- १ तमालपत्र

- १ दालचिनीची काडी

- २ वेलची

- १ टीस्पून जिरे

- १ मोठी वेलची

- ८ काळी मिरी

- ३ लवंगा

- १ टीस्पून लाल तिखट

- १ टीस्पून हळद

- १ टीस्पून धनेपावडर

- १ टीस्पून जिरे पावडर

- ३ टीस्पून मीठ

- १ कप पाणी

अमृतसरी छोले भटुरे बनवण्याची पद्धत

अमृतसरी छोले बनवण्याची पद्धत

अमृतसरी छोले बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात छोलेसोबत चहापत्ती आणि सुका आवळा घालून उकळा. आता कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र, दालचिनी, जिरे, काळी मिरी आणि लवंगा घाला. त्यानंतर त्यात कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता. यानंतर त्यात लसूण, आले, हळद, तिखट, धने पावडर, जिरेपूड आणि मीठ घालून मिक्स करून घ्या. आता त्यात पाणी घाला आणि उकडलेले छोले आणि चिरलेला टोमॅटो घाला. आता यात कोथिंबीर टाकून प्रेशर कुकरमध्ये शिजवा.

भटुरे बनवण्याची पद्धत

भटुरे बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात यीस्ट घ्या. त्यात थोडी साखर आणि पाणी घालून चांगले मिक्स करा. आता एका मोठ्या भांड्यात मैदा, थोडे गव्हाचे पीठ, मीठ आणि यीस्ट मिक्स करा. पाणी घालून पीठ मळून घ्या. आता हे पीठ ओल्या कपड्याने झाकून ठेवा आणि २-३ तास तसंच राहू द्या, म्हणजे त्यात यीस्ट तयार होईल. आता पीठाचा छोटा गोळा घेऊन भटुरा लाटून घ्या. आता कढईत तेल गरम करून त्यात लाटलेला भटुरा तळून घ्या. तुमचा चविष्ट गरमागरम भटुरा तयार आहे. टेस्टी अमृतसरी छोलेसोबत गरमागरम सर्व्ह करा.

WhatsApp channel