Beauty Tips: महागडा शॅम्पू वापरूनही केसांमध्ये चमक येत नाही? अशाप्रकारे लावल्यास होतील रेशमासारखे केस-shiny hair at home if you mix these things in shampoo you will get silky hair ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beauty Tips: महागडा शॅम्पू वापरूनही केसांमध्ये चमक येत नाही? अशाप्रकारे लावल्यास होतील रेशमासारखे केस

Beauty Tips: महागडा शॅम्पू वापरूनही केसांमध्ये चमक येत नाही? अशाप्रकारे लावल्यास होतील रेशमासारखे केस

Aug 03, 2024 10:11 AM IST

shiny hair at home: केसांना चमक आणण्यासाठी नेहमी पार्लर ट्रीटमेंट घ्यावी लागते. ज्यामुळे केस चमकदार, चकचकीत होतात. पण जर तुम्हाला घरच्या घरी असे चमकदार केस हवे असतील तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता.

केसांमध्ये चमक येण्यासाठी उपाय
केसांमध्ये चमक येण्यासाठी उपाय (shutterstock)

Trick to get shiny hair at home: आजच्या काळात प्रत्येकाला रेशमी आणि मुलायम केस हवे असतात. परंतु बदलेली जीवनशैली, तणाव, पोषक तत्वांचा अभाव आणि कधीकधी चुकीच्या उत्पादनांच्या वापरामुळे केस खराब होऊ लागतात. शिवाय ते खूप कोरडे आणि खडबडीत होतात. अशा केसांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते आणि केसांचा दर्जाही खराब होतो. कोरडे केस बरे करण्यासाठी अनेक लोक विविध प्रकारची उत्पादने वापरण्यास सुरुवात करतात.

परंतु अनेकदा केस कितीही निरोगी असले तरी त्यात चमक नसते. केसांना चमक आणण्यासाठी नेहमी पार्लर ट्रीटमेंट घ्यावी लागते. ज्यामुळे केस चमकदार, चकचकीत होतात. पण जर तुम्हाला घरच्या घरी असे चमकदार केस हवे असतील तर तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता. केसांना रेशमी आणि चमकदार बनवण्यासाठी ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केस गळणे आणि कोंडा यासारख्या समस्या देखील दूर होतील. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत ते उपाय.

शॅम्पूमध्ये मिसळा या गोष्टी

बहुतांश स्त्रियांना अशी समस्या उद्भवते की, प्रचंड महागडे शॅम्पू वापरूनदेखील केसांना अजिबात चमक येत नाही. त्यामुळेच हे उपाय तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहेत. जेव्हा तुम्ही शॅम्पूला जात असाल तेव्हा तुमच्या शॅम्पूमध्ये या तीन गोष्टी मिसळा. हे केसांना आश्चर्यकारक चमक आणि रेशमासारखा मऊपणा देतील. चमकदार केस मिळविण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची आवश्यकता असणार आहे.

शॅम्पू

खोबरेल तेल

लिंबाचा रस

कोरफड( एलोवेरा जेल)

अशाप्रकारे लावा शॅम्पू-

सर्व प्रथम, केस धुण्यासाठी आवश्यक तेवढे शॅम्पू घ्या. आता त्यात एक चमचा एलोवेरा जेल टाका. तसेच एक चमचा खोबरेल तेल मिसळा. वर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्या. या सर्व गोष्टींचे मिश्रण करण्यासाठी थोडे पाणी घाला. नंतर हे द्रावण चांगले मिसळून एकजीव करून घ्या. आता हे मिश्रण एखाद्या सामान्य शॅम्पूप्रमाणे केसांना लावा आणि नंतर धुवून टाका. तुम्हाला पहिल्यांदाच वापराने चांगला फरक दिसू लागेल. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे शॅम्पू वापरता तेव्हा तुमचे केस नेहमीच चमकदार आणि रेशमी दिसतील. शिवाय केस अत्यंत मऊ होतील.

एलोवेरा दही मास्क-

कोरफड शरीरासाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केसांना रेशमी आणि मुलायम बनवण्यासाठी कोरफड आणि दह्याचा हेअर मास्कसुद्धा तुम्ही वापरू शकता. हा हेअर मास्क तुमच्या केसांना आवश्यक पोषण देतो. त्यामुळे केस मऊ होतात. ते वापरण्यासाठी, १ चमचा एलोवेरा जेल, १ चमचा दही आणि १ चमचा मध यांचे मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण केसांना अगदी मुळापासून व्यवस्थित लावा. आणि ५ मिनिटे मसाज करा. अशाप्रकारे १० ते १५ मिनिटे हा मास्क लावून ठेवा. त्यानंतर सामान्य पाण्याने धुवून टाका. हा मास्क तुमच्या केसांना कोरडे होण्यापासून वाचवेल.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)