Shilpa Shetty Fitness Workout Video : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. वयाच्या पन्नाशीत देखील अगदी तारुण्यात दिसणारी शिल्पा शेट्टी नेमकं काय करते आणि इतकी फिट राहते, असे प्रश्न सगळ्यांनाच पडतात. अभिनेत्री अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्ससोबत वर्कआउट टिप्स आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या वर्कआऊटमध्ये हाय इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग, कार्डिओ, हेवी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगा यांचं मिश्रण असल्याचं दिसतं. तिचे फिटनेस रुटीन सगळेच फॉलो करू शकतील, इतके सोपे अजिबात नाही. नुकताच तिने एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे आणि स्विस बॉलवर रिव्हर्स हायपर्स कसे करायचे हे दाखवले आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘आजचे सोमवारचे मोटिव्हेशन स्विस बॉलवर प्रोन रिव्हर्स हायपर्स कसे करायचे याबद्दल आहे. ही सोपी परंतु प्रभावी पद्धत आहे. आपल्या ओटीपोटावर आणि पाठीच्या खालच्या भागावर थोडा दबाव आणून आपलं पाठ मजबूत करते. शरीरात सामर्थ्य निर्माण करण्यासाठी, समन्वय सुधारण्यासाठी आणि स्थिरतेसाठी हे योग्य वर्कआउट आहे.’
अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुढे म्हणाली की, ‘१५-२० रीप्सचे ३ सेट मारून आपल्या दिवसाची सुरुवात करा. आणि या दरम्यान ४५ सेकंद विश्रांती घ्या.’
Exercise.com मते, स्विस बॉल रिव्हर्स एक्सटेंशन हा कॅलिस्थेनिक्स, फिटनेस बॉल आणि पिलेट्स व्यायाम आहे, जो प्रामुख्याने पाठीच्या खालच्या भागाला मजबूत करतो आणि काही प्रमाणात अॅब्स, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंगला देखील संतुलित करतो.
यासाठी आपल्याकडे हवे असलेले आणि आवश्यक असलेले एकमेव स्विस बॉल रिव्हर्स एक्सटेंशन उपकरण म्हणजे फिटनेस बॉल. मात्र, असे बरेच भिन्न स्विस बॉल रिव्हर्स एक्सटेंशन प्रकार आहेत जे आपण प्रयत्न करून पाहू शकता, ज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्विस बॉल रिव्हर्स एक्सटेंशन उपकरणांची आवश्यकता असू शकते.
स्टेप १: स्विस बॉलवर पोटावर झोपा, पाय सरळ करा आणि पायाची बोटे जवळजवळ जमिनीला स्पर्श करा. आपले तळवे समोरच्या बाजूस सपाट ठेवा. ही सुरुवातीची स्थिती आहे.
स्टेप २: आपल्या पाठीला सरळ ठेवा आणि आपले पाय आपल्या धडाशी सुसंगत होईपर्यंत वर उचलून व्यायामास प्रारंभ करा. २-३ सेकंद तसेच धरून ठेवा, नंतर खाली उतरा.
स्टेप ३: आवश्यकतेनुसार ही कृती पुन्हा करा.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )