Medicinal properties of Drumstick: भारतीय स्वयंपाक घरात आढळणारे जवळपास सर्वच पदार्थ फक्त जेवणाची चव वाढवत नाहीत, तर ते आरोग्यासाठीही अत्यंत उपयोगी असतात. त्यातीलच एक म्हणजे शेवगा होय. शेवग्याच्या शेंगा, शेवग्याची भाजी आपण वारंवार खात असतो. ती चवीलाही अतिशय स्वादिष्ट असते. परंतु बहुतांश लोकांना माहिती नसेल कि, शेवगा चवीला उत्तम असण्यासोबतच अतिशय औषधीय गुणधर्म असणारा पदार्थ आहे. पोषक तत्वांनी समृद्ध असलेला शेवगा त्याच्या शक्तिशाली गुणधर्मांमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आराम देते. ही एक अशी पौष्टिक वनस्पती आहे. ज्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात.
औषधी गुणधर्मामुळे याला एक चमत्कारिक वृक्ष असेही म्हणतात. आणि म्हणूनच त्याच्या पानांपासून ते फुलांपर्यंत आणि शेंगांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे त्याचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे लोक वजन कमी करण्यासाठी, त्वचेची काळजी घेण्यासाठी, केसांची काळजी घेण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध मार्गांनी वापर करतात. आज आपण शेवग्याच्या वनस्पतीचा स्त्रियांना कसा फायदा होतो याबाबत जाणून घेणार आहोत.
हल्ली महिलांमध्येही हृदयाशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, आपल्या आहारात शेवग्याचा समाविष्ट केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. जे महिलांसाठी वयानुसार अत्यंत महत्वाचे आहे.
जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजीनुसार, शेवगा हे हार्मोन्स संतुलित करण्यासाठी आणि स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्यातील फायटोस्ट्रोजेन घटक या गुणधर्मासाठी जबाबदार आहेत. त्यामुळे महिलांनी शेवग्याचे सेवन केल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
शेवग्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. या गुणधर्मांमुळे शेवगा स्त्रियांमध्ये संधिवात आणि इतर दाहक समस्यांची लक्षणे कमी करते. त्यामुळे महिलांनी शेवग्याचे सेवन करणे गरजेचे आहे.
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्या आहारात शेवगा समाविष्ट करणे खूप फायदेशीर ठरेल. शेवगा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. जे टाइप २ मधुमेह टाळण्यासाठी महत्वाचे आहे.
शेवग्यामध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे चेहेऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही फेस मास्क म्हणून शेवग्याच्या पावडरचा वापर करू शकता. याच्या नियमित वापराने तुमचे सौंदर्य अधिक खुलते.