Shahid Kapoor Birthday: शाहिद कपूरच्या फिटनेसचे रहस्य आहे हे खास डायट, तुम्ही पण करू शकता फॉलो
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Shahid Kapoor Birthday: शाहिद कपूरच्या फिटनेसचे रहस्य आहे हे खास डायट, तुम्ही पण करू शकता फॉलो

Shahid Kapoor Birthday: शाहिद कपूरच्या फिटनेसचे रहस्य आहे हे खास डायट, तुम्ही पण करू शकता फॉलो

Feb 25, 2024 11:15 AM IST

Happy Birthday Shahid Kapoor: शाहिद कपूर अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो नेहमीच फिट दिसतो. फक्त त्याचे अभिनयच नाही तर त्याची बॉडी, फिटनेस देखील चाहत्यांना प्रभावित करते. त्याच्या फिटनेससाठी तो खास शाकाहारी डायट फॉलो करतो.

शाहिद कपूरचे फिटनेस आणि डायट
शाहिद कपूरचे फिटनेस आणि डायट

Shahid Kapoor Fitness and Diet: शाहिद कपूर आज त्याचा ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. चॉकलेट बॉय ते अँग्री यंग मॅन असा लूक बदलण्यासाठी तो खूप मेहनत करतो. वर्कआउटच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय असलेला शाहिद आपल्या आहाराची सुद्धा विशेष काळजी घेतो. त्यामुळे त्याचे एब्स आणि मसल्स बनतात. शाहिद कपूर हा पूर्ण शाकाहारी आहे आणि त्याला व्हेजिटेरियन डायट फॉलो करायला आवडतो. फिट राहण्यासाठी तो त्याच्या आहारतज्ञांनी सुचवलेल्या पद्धतींचा अवलंब करतो. जाणून घ्या काय आहे त्याच्या फिटनेसचे रहस्य.

फिट राहण्यासाठी दिवसातून एवढ्या वेळ खातो

अनहेल्दी स्नॅकिंग आणि गरजेपेक्षा जास्त खाणे टाळण्यासाठी शाहिद कपूर दिवसातून ५ वेळा मील घेतो. जेणेकरून तो फिट राहील आणि प्रत्येक वेळी हेल्दी फूड खाईल. कारण अयोग्य वेळी खाल्लेले अन्नच नुकसान करते आणि लठ्ठपणा वाढवते.

स्वीट क्रेविंग झाल्यास काय खातो

जेव्हा शाहीद कपूरला जेव्हाही गोड खाण्याची क्रेविंग होते तेव्हा तो फक्त हेल्दी पर्याय निवडतो. त्याची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याला डार्क चॉकलेट, गोड किवी आणि केसिन प्रोटीन खायला आवडते.

मीठाच्या प्रमाणावरही ठेवतो लक्ष

यासोबतच शाहिद कपूर आपल्या सोडियमच्या इनटेकची सुद्धा काळजी घेतो आणि कमी खातो. शरीरातील साखरेची कमतरता पूर्ण करण्यासाठी तो नैसर्गिक साखरेच्या सेवनावर अवलंबून असतो. यासाठी आहारात ताज्या फळांचा रस घेतो. याशिवाय तेल आणि फॅट्सपासून पूर्णपणे दूर राहतो.

शाहिद कपूरचे चीट मील

शाहिद कपूरला जेव्हा जेव्हा काहीतरी खावेसे वाटते किंवा त्याला चीट मीलसाठी चीज पॅटीज, स्पायसी सोयाबीन आणि राजमाची डिश खायला आवडते. शाहीद त्याच्या फिटनेसबाबत इतका दक्ष आहे की तो चीट मीलमध्ये सुद्धा अनहेल्दी पदार्थ खात नाही. त्याचे चीट मील सुद्धा प्रोटीनने समृद्ध असते.

भरपूर प्रोटीन

शाहिद कपूरच्या आहारात भरपूर प्रोटीन असते. दिवसाची सुरुवात शाकाहारी प्रोटीन नाश्त्याने होते. यामध्ये दुग्धजन्य पदार्थांपासून बीन्स, कडधान्ये, पालक इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner