Tips to Stay Safe from Heat Stroke: उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून भारतातील अनेक शहरांचे तापमान ४४ अंशांवर पोहोचले आहे. येत्या काही दिवसांत ते ५० अंशांपर्यंत जाणार असल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत उष्णतेच्या लाटेमुळे अनेक ठिकाणी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. कडक उन आणि उष्णतेमुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. या उष्णतेमुळे लोकांना डोकेदुखी आणि जुलाबाचा धोका आहे. हे उष्माघातामुळे होते. बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान याला सुद्धा डिहायड्रेशन, हीट स्ट्रोकचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केल्याचे समोर आले आहे. या वाढत्या तापमानात आधीच आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उष्माघात टाळण्यासाठी काही पद्धती किंवा उपाय तुम्ही आधीच करू शकता. उष्माघातापासून स्वतःला वाचवण्यासाठी या टिप्स जाणून घ्या.
- कडक उन्हामुळे डोके, डोळे, त्वचा, केस आणि ओठांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अति उष्मा आणि उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, कॅप, हॅट आणि छत्री वापरा. आपले डोके नेहमी झाकून ठेवा.
- डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी डार्क चष्मा किंवा काळा चष्मा अवश्य घाला.
- दुपारच्या वेळी कुठेही बाहेर जाणे टाळणे चांगले आहे.
- उष्माघात टाळण्यासाठी लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल फळाचे सरबत, कोकम सरबत आणि सत्तू यासारख्या नैसर्गिक पेयांचा आपल्या दैनंदिन दिनचर्येत समावेश करा. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कायम राहते.
- आपल्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा देखील समावेश करा.
- सतत वाढत असलेले तापमान पाहता घरातच राहणे चांगले असते. मात्र, मुलांना घरात कोंडून ठेवणे अवघड आहे. अशा परिस्थितीत त्यांना घरी खेळायला सांगा. याशिवाय त्यांचे शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा.
- शिळे अन्न खाणे टाळा. ताजे आणि हलके घरी शिजवलेले अन्न खा.
- याशिवाय चहा, कॉफी जास्त प्रमाणात पिणे टाळा. त्यामुळे शरीराला डिहायड्रेशनचा धोका राहतो.
- उन्हाळ्यात सतत काम केल्यामुळे किंवा लहान मुले खेळल्यामुळे त्यांचा थकवा वाढू लागतो. अशा स्थितीत दिवसभर विश्रांतीसाठी वेळ काढा. यामुळे ऊर्जा टिकून राहते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या