Facilities available to senior citizens from Govt: घरातील वडीलधाऱ्यांना कुटुंबाचा पाया म्हणतात, वडीलधाऱ्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांच्याकडून सल्ला घेणे अतिशय फायदेशीर ठरते. त्याचे स्नेह आणि प्रेम अमूल्य असते. वरिष्ठांच्या असण्याने घराला शोभा असते. त्यांच्याकडून जुन्या आठवणी, चालीरीती, आयुष्यातले अनुभव अशा अनेक गोष्टींची शिदोरी असते. त्यामुळेच जगभरात २१ ऑगस्ट हा दिवस‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. समाज, कुटुंब आणि राष्ट्र यांच्या सेवेसाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग व्यतीत केला, त्यांच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
समाजातील ज्येष्ठ नागरिकांची भूमिका, त्यांचे हक्क आणि गरजा याबद्दल जागरूकता पसरवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. वृद्धत्वात अनेक आजार जडतात तर अशावेळी त्यांना उपचारासाठी शासनाकडून खरंच मदत मिळते का आणि मिळत असेल तर कोणती? हे घेणार आहोत. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, भारतात ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ज्येष्ठ नागरिक मानले जाते. म्हातारपणात वृद्ध व्यक्तीला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे ओळखून हा दिवस साजरा केला जातो.
ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजातील एक अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी, केंद्र सरकारने अनेक उपक्रम सुरू केले आहेत, ज्यामुळे त्यांना गोष्टींचा लाभ घेणे आणि त्यात प्रवेश करणे सोपे झाले आहे. बचत योजनांवरील आर्थिक प्रोत्साहन आणि उच्च व्याजदरांव्यतिरिक्त, ज्येष्ठ नागरिकांना भारतातील विविध सेवांवर विविध फायदे देखील प्रदान केले जातात, जसे की आरोग्यसेवांवर विशेष सवलत आणि राज्य बसमधील प्रवास. याशिवाय सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी भारत सरकारने अनेक विशेष पेन्शन योजनाही सुरू केल्या आहेत. यामध्ये अटल पेन्शन योजना, राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली, प्रधानमंत्री वय वंदना योजना आणि वरिष्ठ निवृत्तीवेतन विमा योजना इत्यादी प्रमुख आहेत. या योजनांचा आधार घेऊन ज्येष्ठ नागरिक आपलं आयुष्य आनंदाने जगू शकतात.
‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ साजरा करण्याचा उद्देश जगभरातील ज्येष्ठांचा सन्मान करणे आणि त्यांना तुम्हीसुद्धा समाजातील महत्वपूर्ण घटक आहात याची जाणीव करून देणे हा आहे. ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिदिन आदर केला जात असला तरी ते आपल्यावर ओझे नाहीत याची जाणीव या विशेष दिवशी करून दिली जाते. उलट त्यांच्या छायेखाली आपलं आयुष्य फुलतंय. हा दिवस ज्येष्ठांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.