Happy New Year Wishes: तुमचा जोडीदार लांब आहे? नवीन वर्षासाठी त्याला पाठवा 'या' प्रेमळ शुभेच्छा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Happy New Year Wishes: तुमचा जोडीदार लांब आहे? नवीन वर्षासाठी त्याला पाठवा 'या' प्रेमळ शुभेच्छा!

Happy New Year Wishes: तुमचा जोडीदार लांब आहे? नवीन वर्षासाठी त्याला पाठवा 'या' प्रेमळ शुभेच्छा!

Dec 31, 2023 05:51 PM IST

Happy New Year Wishes for love partner: तुमचा जोडीदार तुमच्यापासून लांब असेल तर त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे खास संदेश पाहा.

Happy New Year 2024 Wishes in Marathi
Happy New Year 2024 Wishes in Marathi (www.wishesmsg.com)

Happy New Year 2024: २०२३ वर्ष संपत आहे. २०२४ हे वर्ष सुरु होयला काहीच दिवस आहेत. नवीन वर्षाच्या दिवशी, लोक एकमेकांना खूप छान संदेश पाठवतात. तरुण लोक आवर्जून सरत्या वर्षाला बाय म्हणत पार्टी करतात. आपल्या जोडीदारासोबत हा वर्षाचा शेवटचा दिवस घालवायचा आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची अनेकांची इच्छा असते. त्याच वेळी, आपला प्रेमळ पार्टनर जर काही कारणास्तव एकमेकांपासून दूर असल्यास नवीन वर्षाच्या प्रेमळ संदेश पाठवून शकता. या संदेशांमध्ये तुम्ही आपले आपल्या पार्टनर विषयीचे प्रेम व्यक्त करू शकता. नवीन वर्ष प्रेमळ जोडप्यांसाठी खूप खास असते. आज आम्ही तुमच्यासाठी संदेश, कविता आणि कोट्स घेऊन आलो आहोत, जे पाठवून तुम्ही नवीन वर्षाच्या खास शुभेच्छा (messages, wishes, Facebook, WhatsApp Status, quotes) देऊ शकता.

बघा हे संदेश

> सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व

नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच आपण करूयात एकत्र स्वागत,

आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण करूयात एकत्र

या प्रार्थनेसह, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बायको!

> गेलं ते वर्ष आणि गेला तो काळ,

आता नवीन आशा अपेक्षा घेवून सजवू २०२४ साल,

नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

> वर्ष संपून गेले आता तरी खरं मनापासून हो म्हण.

माझं तुझ्यावर प्रेम आहे नाहीतर तुझ्या विना माझं जीवन व्यर्थ आहे!

तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा,

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !

> तुझ्या आयुष्यात नेहमी प्रेम, हास्य आणि सकारात्मकता भरून राहो.

नवीन वर्षाच्या तुला शुभेच्छा!

> "येवो समृद्धि अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

नव वर्षाच्या या शुभदिनी..!

तुला नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!

(मेसेज क्रेडिट- सोशल मीडिया)

Whats_app_banner