Good Morning Wishes: सकाळची चांगली सुरुवात करण्यासाठी आपल्या लव्ह पार्टनरला म्हणा गुड मॉर्निंग, पाठवा हे संदेश
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Good Morning Wishes: सकाळची चांगली सुरुवात करण्यासाठी आपल्या लव्ह पार्टनरला म्हणा गुड मॉर्निंग, पाठवा हे संदेश

Good Morning Wishes: सकाळची चांगली सुरुवात करण्यासाठी आपल्या लव्ह पार्टनरला म्हणा गुड मॉर्निंग, पाठवा हे संदेश

Jul 04, 2024 06:32 AM IST

Good Morning Messages in Marathi: जेव्हा तुम्ही एखाद्यावर प्रेम करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला सगळीकडे फक्त तुमच्या प्रेमाचा चेहरा सगळीकडे दिसतो. अशा वेळी सकाळची चांगली सुरुवात करण्यासाठी तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरला या मेसेजेसद्वारे गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देऊ शकता.

लव्ह पार्टनरसाठी गुड मॉर्निंग मॅसेज
लव्ह पार्टनरसाठी गुड मॉर्निंग मॅसेज (Shutterstock)

Good Morning Messages for Love Partner: आयुष्यात प्रेम असेल तर नेहमीच एक वेगळीच अनुभूती येते. जर तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर तुम्हाला ही भावना नक्कीच समजेल. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा सकाळ-संध्याकाळ त्याचा विचार करत असतो. तसेच सगळीकडे फक्त आपल्या प्रिय व्यक्तीचा चेहरा दिसतो. विशेषत: जेव्हा हे प्रेम नवीन असते. अशावेळी सकाळी या मेसेजेसने तुमच्या प्रेमाला गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा द्या.

लव्ह पार्टनरसाठी गुड मॉर्निंग मॅसेज

थोडसं प्रेम, थोडीशी आपुलकी

थोडीशी काळजी, थोडीशी विचारपूस

जीवनात आणखी काय हवं...

शुभ प्रभात

 

फुलाला फुलायला जशी

पाण्याची गरज असते

तशी नातं फुलायला

मायेच्या आणि प्रेमाच्या

ओलाव्याची गरज असते...

गुड मॉर्निंग

 

घट्ट विणायचं पण तुटू नये कधीच

धागा धागा गुंफावा, गुंतू नये कधीच

अशी असावी साथ, जी सुटू नये कधीच

आपल सुंदर नातं असं असावं, जे तुटू नये कधीच...

शुभ प्रभात

आठवणींच्या भोवऱ्यात आपला एक क्षण असावा,

बहरलेल्या वातावरणात एक फुल आपला असावा

आणि जेव्हा आपल्या प्रियजनांची आठवण येते

तेव्हा त्या आठवणीत आपलं नाव असावं.

गुड मॉर्निंग

 

आठवणींच्या सागरातील प्रत्येक क्षण आपला असू दे

बहरलेल्या कळ्यांमधलं प्रत्येक फूल आपलं असू दे

प्रिये, मी तुला गुड मॉर्निंग म्हणतोय

माझ्या स्वप्नात फक्त तुझा चेहरा असू दे

गुड मॉर्निंग

 

दु:खद क्षणाची आठव ठेवू नको

वादळातही आपल्या अस्तित्वाची काळजी घे

कोणाच्या तरी आयुष्याचे सुख आहे तू

फक्त हा विचार आपल्या मनात ठेव

गुड मॉर्निंग

मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो

तू नेहमी असेच हसत राहा

माझे दिवस आणि रात्र कशीही गेली तरी

जेव्हा तू डोळे उघडशील

तेव्हा आनंदाचा पाऊस पडो.

गुड मॉर्निंग

 

आमच्या चुकांमुळे कधीही तुटू नका

आमच्या मस्तीने कधीही रुसू नका

तुमची इच्छा हेच आमचे जीवन आहे,

आयुष्यात आम्हाला कधीही विसरू नका.

गुड मॉर्निंग

प्रत्येक क्षण तुझ्यावर प्रेम करण्याचे वचन

प्रत्येक क्षण तुझ्यासोबत राहण्याचं वचन,

मी तुला विसरून जाईल हा विचार करू नको

आयुष्यभर तुझ्यासोबत चालण्याचं वचन.

गुड मॉर्निंग

Whats_app_banner